गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (17:30 IST)

रवी शास्त्री टीमचे नवे संचालक; दोन विदेशी प्रशिक्षकांना डच्चू

भारतीय संघाचा माजी कर्णधार रवी शास्त्री यांची आगामी एकदिवसीय मालिकेसाठी संचालकपदी निवड केली आहे. इंग्‍लविरुद्ध टीम इंडियाचा दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हा निर्णय घेतला आहे. तसेच बीसीसीआयने विदेशी प्रशिक्षक ट्रेवर पॅनी आणि डॉवेस यांनी डच्चू दिला आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षक डंकन फ्लेचर कायम राहणार असून रवी शास्‍त्री भारतीय संघाला केवळ मार्गदर्शन करणार आहेत. 
 
ट्रेवर पॅनी हे भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक तर  डॉवेस हे गोलंदाजीचे प्रशिक्षक आहे. या दोघांना आगामी एकदिवसीय मालिकेमध्‍ये विश्रांती देण्यात आली आहे. त्‍यांच्‍याऐवजी माजी अष्‍टपैलू खेळाडू संजय बांगर आणि भारत अरुण यांना सहायक प्रशिक्षक म्‍हणून निवड करण्‍यात आली आहे. माजी फिरकीपटू आर.श्रीधर यांना संघाच्‍या सपोर्ट स्‍टापमध्‍ये सहभागी करुन घेतले आहे.
 
भारताचे अष्‍टपैलू खेळाडू संजय बांगर यांनी आयपीएलच्‍या सातव्‍या पर्वामध्‍ये किंग्‍ज इलेव्‍हन पंजाबचे प्रशिक्षक म्‍हणून भूमिका पार पाडली आहे.