शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|
Last Modified: लंडन , शुक्रवार, 27 मार्च 2009 (15:55 IST)

राजस्थान रॉयल्स पुरस्कारच्या स्पर्धेत

राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रिमियर लीगच्या पहिल्या मालिकेत शानदार प्रदर्शन करून पुरस्कारावर आपले नाव कोरले होते. त्याने प्रभावीत झालेला जयपूर येथील संघ लारेस विश्व स्पोर्ट्स पुरस्कार 'वर्ल्ड टीम ऑफ द ईयर 2008' चे नामांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्नच्या नेतृत्त्वात रॉयल्सने कमजोर संघाच्या रूपात वाटचाल केली. मात्र गत वर्षाच्या मे महिन्याच्या सुरवातीला झालेल्या आयपीएल ट्वेंटी-20 स्पर्धेचा पुरस्कार या संघाने खिशात घालला.

लारेस पुरस्काराच्या आयोजकानी 'वर्ल्ड टीम ऑफ द ईयर' च्या नामांकनाच्या यादीत जयपूर संघाला सहभागी करून घेतले आहे.

लारेस विश्व स्पोर्ट्स पुरस्काराच्या नामांकन स्थळ व तारखेची घोषणा 16 एप्रिलला होईल.