गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वार्ता|
Last Modified: कोलंबो , शनिवार, 12 सप्टेंबर 2009 (12:15 IST)

राहूल द्रविड पाचव्या क्रमांकवर

'द वाल' म्हणून प्रसिध्द असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणार्‍यांच्या यादीत झळकला आहे. यादीत तो पाचव्या स्थानी आहे.

द्रविडने त्रिकोणी मालिकेत शुक्रवारी न्यूजीलंड विरूध्द मैदानात उतरून भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनची (334) बरोबरी केली आहे. बर्‍याच कालावधीनंतर भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघात पुनरागमन केलाला द्रविड या मालिकेतील पुढील सामन्यात अजहरूद्दीनचीचा विक्रम तोडणार आहे.

सर्वाधिक सामने खेळणारे पहिले पाच क्रिकेटपटू-
1. सनथ जयसूर्या (श्रीलंका, 436 सामने)
2. सचिन तेंडूलकर (भारत, 426 सामने)
3. इंजमाम-उल-हक (पाकिस्तान, 378 सामने)
4. वसीम अकरम (पाकिस्तान, 356 सामने)
5. राहुल द्रविड (भारत, 334 सामने), मोहम्मद अजहरुद्दीन (भारत, 334 सामने)