शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: मेलबोर्न , गुरूवार, 17 नोव्हेंबर 2011 (12:45 IST)

रोबक यांचे इंग्लंडमध्ये दफन व्हावे : नातेवाइकांची इच्छा

गेल्या आठवड्यात केपटाऊनमध्ये आत्महत्या करणार्‍या प्रसिद्ध क्रिकेट लेक पिटर रोबक यांचा मृतदेह इंग्लंडमध्ये दफन करण्याची परवानगी त्यांच्या नातेवाइकांनी मागितली आहे. द ऑस्ट्रेलियन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार रोबक यांच्या नातेवाईकांनी मृतदेहावर दावा केला आहे.

त्यानुसार मृतदेह इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे. यापूर्वी या क्रिकेट समालोचकाला दक्षिण आफिक्रेत अथवा ऑस्ट्रेलियात दफन करण्यात येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. दक्षिण आफ्रिकेत रोबक यांचे कुटुंबीय राहत होते. पण त्यानंतर ते ऑस्ट्रेलियात वास्तव्यास गेले. पर रोबक यांची बहिण, मित्र आणि आई यांनी रोबकचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असल्याने त्यांना तेथेत दफन करण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.