गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

विराट कोहलीने मोडला ख्रिस गेलचा विश्वविक्रम

WD
ढाका- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने विश्वविक्रम केला आहे. कोहली सगळ्यात कमी एकदिवसीय सामन्यात 19 शतके करणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीने 124 सामन्यांत 19 शतक ठोकून ख्रिस गेलचा विक्रम कोडीत काढला आहे. याशिवाय कोहलीची लाराशी बरोबरी केली आहे. कोहलीने 48 चेंडूंत 50 धावा आणि नंतर 19 वे शतक ठोकून वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या शतकांची बरोबरी केली.

दरम्यान, वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने 189 एकदिवसीय सामन्यांत 19 शतक पूर्ण केले होते. दरम्यान बुधवारी झालेल्या आशिया चषकातील सामन्यात बांगलादेशविरूद्ध कोहलीने शानदार 136 धावांची कर्णधारी शतकी खेळी केली होती.