शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated :मीरपूर , शनिवार, 5 एप्रिल 2014 (11:44 IST)

'विराट' खेळीमुळे भारत अंतिम फेरीत

रविचंद्रन अश्विनचे 22 धावात 3 बळी आणि विराट कोहलीच तडफदार अशा नाबाद 72 धावा यांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला दुसर्‍या उपान्त्य सामन्यात 6 गडी आणि पाच चेंडू राखून पराभूत केले.
 
या विजासह भारताने येथे खेळल जात असलेल्या पाचव्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. रविवारी भारत आणि श्रीलंका या दोन आशिाई राष्ट्रातच विजेतेपदासाठीची अंतिम झुंज होत आहे. 2012 साली श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या चौथ्या ट्वेंटी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडीजने अंतिम सामन्यात श्रीलंकेला नमवून विजेतेपद मिळविले होते.
 
विजयासाठी 173 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि अंजिक्य राहाणे यांनी 3.5 षटकात 39 धावांची सलामी दिली. रोहित शर्माने 13 चेंडूवर 4 चौकार 1 षटकारासह 24 धावा झटपट जमविल्या. परंतु हेंड्रिक्सने त्याला बाद केले. अंजिक्य राहाणे व विराट कोहली यांनी दुसर्‍या जोडीस 34 चेंडूत 38 धावांची भर घातली. पारनेलने राहाणेला (30 चेंडू 2 चौकार 1 षटकार 32) बाद केले. विराट व युवराजनी तिसर्‍या जोडीस 51 चेंडूत 56 धावाची भर घातली. रैना व विराटने चौथ्या जोडीस 15 चेंडूत 34 धावा झोडपल्या. त्यामुळे भारताचा विजय दृष्टिपथात आला. इम्रार ताहीरने युवराजसिंगला (17 चेंडू 2 चौकार 18) टिपले. तर रैना हेंड्रीक्सला षटकार खेचण्याचा प्रयत्नात 10 चेंडूवर 3 चौकार 1 षटकारासह 21 धावा काढून बाद झाला.
 
सामनावीर ठरलेल्या विराट कोहलीने पूल, कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह असे शानदार फटके मारले. त्याने 44 चेंडूवर 5 चौकार 2 षटकारासह नाबाद 72 धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा चोकर्स ठरला.
 
कर्णधार प्लेसिस याचे अर्धशतक व त्याने डुमिनीसह केलेली महत्त्वपूर्ण भागीदारी याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या उपान्त्य सामन्यात भारताला विजयासाठी 173 धावांचे जबरदस्त आव्हान दिले. नाणेफेक जिंकून कर्णधार प्लेसिसने प्रथम फलंदाजी घेतली. भुवनेश्वर कुमारने क्विटॉन डी कॉक याला (6) झटपट टिपले. परंतु, हशिम आमला (16 चेंडू 4 चौकार 22) व प्लेसिस यांनी दुसर्‍या जोडीस 27 चेंडूत 35 धावांची भर घातली. अश्विनने आमलाचा त्रिफळा घेतला. 
 
प्लेसिस आणि डुमिनी या दोघांची जोडी जमली. या दोघांनी भारताच्या सुरेश रैना, अमित मिश्र या फिरकी गोलंदाजांचा भरपूर समाचार घेतला. या दोघांनी तिसर्‍या जोडीस 52 चेंडूत 71 धावांची भागीदारी केली. आश्विननेच प्लेसिसचा (41 चेंडू 5 चौकार 1 षटकार 58) त्रिफळा घेतला. परंतु, डुमिनीने डेव्हिड मिलेरसह पाचव्या जोडीस 27 चेंडूत 43 धावांची भर घातली. तत्पूर्वी आश्विनने डी’व्हिलिअर्सला (10) झटपट टिपले. डुमिनी 40 चेंडूवर 1 चौकार 3 षटकारासह 45 धावांवर नाबाद राहिला. मिलेरने 12 चेंडूत 2 चौकार 1 षटकारासह नाबाद 23 धावा काढल्या. 
 
दक्षिण आफ्रिकेने बेहारदिनऐवजी कर्णधार प्लेसिसला खे‍ळविले. भारताने संघात कोणताही बदला केला नाही. शिखर धवन व मोहम्मद शमी हे संघाबाहेर राहिले. 
 
 
सामनावीर : विराट कोहली.