मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 18 एप्रिल 2014 (10:09 IST)

श्रीनिवासन यांना कोर्टाचा दणका

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) पदच्युत अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाने गुरुवारी आणखी एक दणका दिला आहे. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीनिवासन यांची चौकशी करण्याचेही आदेश सुप्रीम कोर्टाने यावेळी दिले आहेत.

श्रीनिवासन यांच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारण्याचा अर्जही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे.  जोपर्यंत आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणातील सर्व आरोपांतून त्यांना क्लीनचीट मिळत नाही तोपर्यंत श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळू शकणार नसल्याचेही सुप्रीम कोर्टाने यावेळी स्पष्ट केले आहे.