शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|

सौरव गांगुली 'गॅलेस'चा ब्रांड एम्बेसिडर

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली कोणत्या ना कोणत्या कारणावरून आता पर्यंत चर्चेत राहीला आहे. इंडियन प्रिमियर लीगची (आयपीएल) मालिका तर गांगुलीसाठी खरच इंडियन प्रॉब्लेम लीग ठरली आहे.

सध्याचा काळ गांगुलीसाठी खूपच घातक ठरत आहे. टाटाच्या व्यतिरिक्त कुठल्याच मोठ्या कंपनीच्या जाहिरात त्याच्याकडे नाही. अशा परिस्थिती लहान कंपनीच्या जाहिरातीसाठी काम करण्याची वेळ गांगूलीवर आली आहे.

पेप्सीचे ब्रांड एम्बेसडर राहिलेला गांगुली आता कोलकत्ताच्या ‘गॅलेस’ नामक ऑटोमोबाइल कंपनीचा ब्रांड एम्बेसडर बनला असून त्याच्या जाहिरातीत गांगूली दिसणार आहे.