बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2016 (14:25 IST)

हरभजनकडे ‘कुणीतरी येणारं येणारं गं’

भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगच्या घरी लवकरच नवीन पाहुणा येणार आहे. आयपीएलच्या शुक्रवारी झालेल्या उदघाटन सोहळच्यावेळी हरभजनची पत्नी  गीताने परिधान केलेल्या सैलसर पोषाखावरुन ती गर्भवती असल्याची चर्चा सुरु झाली. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात गीता आणि हरभजन विवाबबद्ध झाले. 
 
मुळच्या लंडनच्या गीताने बॉलिवुडमधल्या काही सिनेमांमध्ये काम केले मात्र तिला अपेक्षित यश मिळाले नाही. या दरम्यान तिची हरभजन बरोबर ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते.