शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जुलै 2016 (13:06 IST)

कर्मचार्‍यांना दिली जाते कारलं खाण्याची शिक्षा

ऑफिसमध्ये टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे शिक्षा दिल्याचं कधी तुम्ही ऐकलंय का? पण असं घडलंय. 
 
चीनमध्ये एका कंपनीने कर्मचार्‍यांना दिलेलं टार्गेट पूर्ण झालं नाही म्हणून चक्क कारलं खाण्याची शिक्षा सुनावली आहे. 
 
40 कर्मचार्‍यांना ही कारलं खाण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काही कर्मचारी कारलं नाही खाऊ शकले तरी त्यांना जबरदस्ती ते खाण्यास सांगितलं गेलं. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. ही घटना 16 जूनची आहे पण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेनंतर अर्ध्याहून अधिक लोकांनी जॉब सोडला. 
 
या शिवाय पुशअप्स, धावणे अशा शिक्षादेखील कर्मचार्‍यांना दिली जात असल्याचं एका कर्मचार्‍याने म्हटलं आहे.