शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2015 (10:48 IST)

गुहेतील अनोखा आलिशान व्हिला

अमेरिकेच्या मिसुरी राज्यात कधी गेलात तर गुहांतून बांधलेले आलिशान व्हिला पाहायला विसरू नका. या राज्यात सँड स्टोनमधील अनेक गुहा आहेत आणि विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना त्या विकत घेता येतात. गुहा पसंत पडली तर खरेदी करून तेथे मनासारखे घर बांधण्याचा येथे ट्रेंड आहे. 
 
विशेष म्हणजे घरांना भिंती मुद्दाम बांधाव्या लागत नाहीत कारण गुहेतील खडक भिंतीची जागा घेतात. येथे कल्पनाशक्तीलाही चांगले आव्हान मिळते आणि अजीबगरीब घरे अशी निर्माण होतात.
 
कर्ट आणि डेबोरा स्लीपर या जोडीने असेच 15 हजार चौरस फुटाच्या गुहेत आपला आलिशान व्हिला उभारला आहे. दोन मजली या घराला पार्टीशन लाकडाचे आहे तर खडकांचा वापर भिंतींसारखा केला आहे. कोणत्याही हवामानाचा ही घरे सामना करू शकतात. ऊर्जेसाठी सोलर पॅनलचा वापर सोयीचा ठरतो. 
 
अशा घरात राहणार्‍यांना निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचे सुख मिळते असे स्लीपर जोडीचे म्हणणे आहे. 
 
सोलर ऊर्जेमुळे ही घरे रात्री नुसती उजळून निघत नाहीत तर गुहेतील गूढ प्रकाशाप्रमाणे चमकतातही.