testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विश्वाचा त्रिमितीय नकाशा बनवण्यात संशोधकांना यश

Last Modified बुधवार, 27 मे 2015 (16:32 IST)
अंतराळाच्या या अफाट पसार्‍याचा अंदाज येणे हे अतिशय कठीण काम आहे. त्यामुळेच आपल्याकडे त्याला आदी-अंत नसलेली सृष्टी म्हटले जाते. मात्र तरीही आता खगोल भौतिकशास्त्रज्ञांनी विश्वाचा त्रिमितीय नकाशा तयार केला असून त्यात विश्वाची आजपर्यंची स्थिती अधिक स्पष्ट चित्रात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विश्व हे दोन अब्ज प्रकाशवर्ष अंतरात पसरलेले आहे. दीर्घिकांच्या महासंचाचा हा गोलाकार नकाशा असून त्यात विश्वामध्ंस द्रव्य कशा पध्दतीने विखुरलेले आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.

त्याचबरोबर कृष्णद्रव्याचाही वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. कृष्णद्रव्य हे अजूनही भौतिकशास्त्रातील एक मोठे कोडे मानले जाते. दीर्घिकांचे स्थान हे एकसमान पध्दतीने आहे म्हणजेच त्या एकसमान पध्दतीने विखुरलेल्या आहेत. पर्वतांची जशी शिखरे व दर्‍या असतात तशीच रचना या दीर्घिकांची शिखरे व दर्‍या यात दिसून येते. पूर्वीच्या विश्वातील पुंज स्पंदनांमुळे हा परिणाम झाला असावा, असे वॉटर्लू विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र विभागाचे प्रा. माईक हडसन यांनी म्हटले आहे. विश्वातील द्रव्याची गती व स्थान कळले तर त्यातून खगोल भौतिकशास्त्रज्ञ विश्वाचे प्रसरण व त्यात कृष्णद्रव्य किती आहे याचा अंदाज लागू शकेल.


यावर अधिक वाचा :