शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

'इंडियन' मोटरसायकिल आता भारतात

- भीका शर्मा

PR
इंडियन मोटरसायकिल नाव एकूण अस वाटत असेल की हे एक भारतीय मोटरसायकिल ब्रँड आहे. पण असे नाही आहे, 'इंडियन' विदेशी रस्त्यांवर धावणारी शानदार सुपरबाईक निर्माता कंपनी आहे. फक्त याचे नाव इंडियन आहे पण ही एक अमेरिकन कंपनी आहे. इंडियन मोटरसायकिलची नीव सन 1901मध्ये ठेवण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत बरेच चढ उतार बघितल्यानंतर कंपनीने क्रूझ बाइक सेग्‍मेंटमध्ये एकापेक्षा एक शानदार बाइक्स बाजारात आणल्या आहेत.
भारतीय बाजारात या ब्रँडला आणायचे आहे अशी चर्चा बर्‍याच दिवसांपासून सुरू होती. याच क्रमात पोलारिस इं‍डस्‍ट्रीजने या मोटरसायकिलला भारतात लाँच केले आहे.

अमेरिकन ब्रँड इंडियन मोटरसायकिलने भारतीय बाजारात आपल्या तीन नवीन बाइक्स चीफ क्लासिक, चीफ क्लासिक विंटेज आणि चीफ्टेनची लाँचिंग केली आहे.

PR
कंपनीने या तिन्ही सुपर क्रूजर बाइक्सच्या किमती देखील बाजारात जारी करण्यात आल्या आहेत. इंडियन मोटरसायकिलांना भारतात सध्या सीबीयू रूटच्या माध्यमाने आणले आहे ज्यात यांची किंमत 26.5 लाख रुपये ते 33 लाख रुपयांपर्यंत आहे.

इंडियन चीफ क्लासिकची किंमत 26.5 रुपये ठेवण्यात आली, जेव्हा की चीफ विंटेजची किंमत 29.5 लाख रुपये आहे. तसेच याच्या रेंजमधील सर्वात महागडी बाइक चीफटेनची किंमत 33 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

PR
या सर्व इंडियन मोटरसायकिलांमध्ये 1811 सीसीचा एयरकूल्ड फ्यूल इंजेक्टेड थंडर स्ट्रोक पेट्रोल इंजिन लागलेले आहे जे 139mmचा टॉर्क देते. याचे फीचर्स फारच शानदार आहे. या बाइक्समध्ये लेदर सीट, की-लेस स्टार्ट, इलेक्ट्रॉनिक विंड स्क्रीन, ब्लूटुथच्या फोनला कनेक्ट करणे व म्युझिक ऐकण्यासारखी सुविधाही उपलब्ध आहे.

शानदार आणि भारी बॉडी डिझाइन असलेले या बाइक्सला लांबचा पल्ला गाठणार्‍यांसाठी तयार करण्यात आले आहे. बाइक्सच्या किंमती प्रिमियम सेगमेंटमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या बाइक्स हार्ले डेविडसन तथा ट्रायम्फ सारख्या लग्जरी ब्रांड्सला नक्कीच आव्हान देऊ शकतात.