testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

विंचवाच्या विषाची किंमत तब्बल 68 कोटी रूपये

scorpion
अमेरिका- जगात जे काही थोडे महागडे द्रव पदार्थ आहेत त्यात लॉरस विक्वेस्यीयस या जातीच्या विषारी विंचवाच्या विषाचा समावेश असून हे विष लिटरला 10.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 68 कोटी रूपये दराने विकले जाते. या विषाचे वैद्यक शास्त्रात मोठे योगदान आहे.
तेल अवीव विद्यापीठातील प्रो. मायकेल गुरवेझ यांनी त्यांच्या टीमसह या विषावर केलेल्या संशोधनात हे विष वैद्यकीय ट्रीटमेंटसाठी खूपच उपयुक्त ठरल्याचे सांगितले. या संदर्भातला एक अहवाल 2013 साली प्रसिद्ध करण्यात आला होता. या अहवालानुसार या विषातील काही घटक कॅन्सरपेशींच्या वाढीला थांबविण्यासाठी उपयुक्त ठरले आहेत.

हे घटक कॅन्सरपेशींची निर्मिती थांबवितात तसेच अवयव बदल शस्त्रक्रिया केल्यानंतर अनेकदा नवीन बसविलेला अवयव रूग्णाचे शरीर स्वीकारत नाही हा धोका या विषामुळे टाळता येतो.
या विषातील काही घटक शरीराच्या प्रतिकारकशक्तीत काही सिंथेटिक बदल घडवितात व त्यामुळे नवीन अवयव स्वीकारण्यास शरीराकडून होत असलेला विरोध संपतो.
विंचवातून हे विष मिळविण्यासाठी त्याला करंट दिला जातो त्यामुळे विष त्याच्या नांगीत येते. एकावेळी फक्त दोन ते तीन थेंबच विष मिळते. त्यामुळे लिटरभर विष मिळविण्यासाठी हजारो विचवांचा वापर करावा लागतो व यामुळे त्याची किंमतही अधिक आहे.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

लघु बचतीचे व्याजदर वाढले

national news
लघु बचत योजनांसारख्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी), ...

लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री तयार

national news
लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री गुरूवारपासून तयार होणार आहे. ...

जिओ फोन, जिओ फोन २ ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ पाहणार

national news
Jio Phone आणि Jio Phone 2 च्या ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ देखील पाहू शकणार आहेत. याआधी ...

महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रात पीछेहाट

national news
वीज, वायू, पाणी व अत्यावश्यक सुविधांअभावी प्रगतिशील महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रात ...

राज्यात 11 हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त

national news
राज्यात मान्यताप्राप्त वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांतील आर्टस्, कॉमर्स, सायन्स ...