Widgets Magazine
Widgets Magazine

वयाच्या 10 व्या वर्षात लिहिली इंग्रजी कादंबरी

hardik upreti

जर स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्याकहे प्रचंड इच्छाशक्ती आहे, तर यश मिळवणे अवघड नसते असे म्हणतात.  मग वय कितीही असो. असाच एक कारनामा जवळील हुडेती गावातील एका दहा वर्षाच्या बालकाने करून दाखवला आहे. या बुद्धिमान बालकाचे नाव आहे हार्दिक उप्रेती.
 
जे वय खेळण्या-बागडण्याचे असते त्याच वयात हार्दिक उप्रेतीने इतिहास रचून आपल्या डोंगराळ प्रदेशाचे नाव उज्जवल केले आहे. त्याची लहान वयातील कामगिरी कोणत्याही स्वप्नवत कामगिरीहून कमी नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार दहा वर्षीय हार्दिकने इंग्रजी भाषेत 'ख्रिसमस मिरॅकल' नावाची कादंबरी लिहिली आहे. हार्दिकची ही पहिलीच  कादंबरी आहे. ही कादंबरी ब्लू रोज पब्लिकेशनने मार्च महिन्यात प्रकाशित केली आहे. अ ख्रिसमस मिरॅकल कादंबरी ५९ पानांची व ९ भागांमध्ये छापली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार हार्दिक बीजीएस इंटरनॅशनल स्कूल दिल्ली येथे सहावीच्या वर्गात शिकत आहे. त्याचे वडील लोकेश उप्रेती दिल्लीत एका मल्टीनॅशनल कंपनीत डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत तर आई गृहणी आहे. 



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आज-काल

news

खारीच्या उडणार्‍या प्रजातीचा शोध

उत्तर अमेरिकेमध्ये शास्त्रज्ञांना उडणार्‍या खारूताईच्या एका नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. ...

news

येथे चार नंबर आहे मृत्यूचा आकडा

प्रगत मानला जाणारा दक्षिण कोरिया हा देश अजबगजब देश आहे. येथील नागरिक अंधश्रद्धाळू आहेत व ...

news

काय माश्यांनाही ओठ असतात?

हिंदी महासागरामध्ये शास्त्रज्ञांनी एक अनोख्या माशाचा शोध लावला असून त्याला चक्क ओठ आहेत. ...

news

मुक्तचा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाशी करार

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, ...

Widgets Magazine