Widgets Magazine

अजब प्रेमाची गजब गोष्ट : 15 वर्षाचा नवरा आणि 73 वर्षांची वधू

young boy old woman
प्रेम आंधळे असते असे म्हणतात, कारण प्रेमात अनेकदा वय, धर्म, जात पाहिले जात नाही. काही जणांच्या मते हे फक्त चित्रपट आणि पुस्तकात शोभते. पण इंडोनेशियामध्ये वयाच्या सीमा ओलांडत एका 15 वर्षाच्या मुलाने 73 वर्षाच्या महिलेशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे.
इंडोनेशियामधील सुमात्रा येथील ही घटना आहे. दोघांनीही आमचे लग्न न करून दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांचा लग्नाला परवानगी ‍देण्यात आली आणि दोघे विवाह बंधनात अडकले. हे तेव्हा सुरू झाले जेव्हा 15 वर्षाच्या सेलामत रियादीला मलेरिया झाला होता. शेजारी राहणार्‍या यांनी यावेळी त्याची पूर्ण काळजी घेतली. त्यादरम्यानच दोघांमधील प्रेम फुलत गेले अशी माहिती गावाप्रमुख सिक ऐनी यांनी दिली आहे.
इं‍डोनेशियन कायद्यानुसार तरूणांसाठी लग्नाचे वय 19 तर मुलींसाठी 16 आहे. मात्र, तरीही सुमात्रा गावाच्या प्रशासनाने या दोघांच्या लग्नासाठी मंजुरी दिली.


यावर अधिक वाचा :