testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट, एसिलर व्हिजन फाउंडेशन व टायटन आय प्लस यांचा एकत्रितपणे व्हिजन १०००० चा उपक्रम

policemen
Last Modified गुरूवार, 28 जून 2018 (14:59 IST)
या उपक्रमांतर्गत मुंबई महानगरपालिकेचे कचरावेचक कर्मचारी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, बस चालक आणि मुंबई पोलिस याना १०००० चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
तसेच राज्य राखीव पोलिस दल मैदानात ६०० पोलिसांची मोफत नेत्र तपासणी
केली जाणार आहे.

मुंबई २७ जुन २०१८ : गुगल ऑर्ग ग्रांट, विकलांगांना साहाय्य आणि शिक्षण केंद्रित उपक्रम राबवणारी, मुंबई स्थित स्वयंसेवी संस्था रत्नानिधी चॅरीटेबल ट्रस्टद्वारे आणि टायटन आय प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईकरांसाठी डोळ्यांचे आरोग्य जपणारा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत चांगल्या दर्जाचे १०००० पेक्षा अधिक चष्मे मोफत दिले जाणार आहेत.
मुंबईतील गोरेगाव येथील एस.आर.पी.एफ. मैदानात दिनांक २७ ते २८ जून या कालावधीत सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत हे शिबीर आयोजित करण्यात आले असून या उपक्रमांतर्गत ६०० मुंबई पोलिस कर्मचार्‍यांची नेत्रतपासणी केली जाणार आहे.

या तपासणी शिबीरात टायटनच्या नेत्रतज्ज्ञांकडून उपस्थित व्यक्तीच्या डोळ्यांची तपासणी
केली जाईल. या तपासणीनुसार एसिलर व्हिजन फाउंडेशनद्वारे चष्म्याची लेन्स आणि रत्ना निधी कडून चष्म्याची फ्रेम या गोष्टी पुरवल्या जातील. अशा प्रकारे संपूर्ण तपासणी व त्यानुसार तयार चष्मा गरजूंना उपलब्ध करून दिला जाईल. पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबानादेखील या शिबीराचा लाभ घेता येईल.
व्हिजन १०००० या उपक्रमातील तपासणी शिबीराचे हे दुसरे सत्र असून नेत्र तपासणीचा मुख्य उद्देश यातून साध्य होत आहे. या उपक्रमातील पहिले सत्र २२ मे २०१८ रोजी रत्ननिधी संस्थेच्या महालक्ष्मी येथील वैद्यकीय केंद्रात पार पडले. पहिल्या तपासणी शिबीराचा लाभ घेतलेल्या व्यक्तींना चांगल्या दर्जाचे चष्मे १६ जुलै रोजी महालक्ष्मी येथील रत्ना निधी आणि रोटरी वैद्यकीय केंद्रात दिले जातील.
रत्ननिधी चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजीव मेहता यांनी याबाबत सांगितले की,
an optician
अशा सहयोगी दृष्टीकोनातून लाभणारे सकारात्मक सामाजिक परिणाम पुढे जाण्यास कायम प्रोत्साहन देत राहतात. व्हिजन १०००० हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्याकरिता एसिलर आणि टायटन आय प्लस यांच्यासह काम करणं ही रत्ना निधीसाठी गौरवास्पद बाब आहे.
संदीप कर्णिक, डीआयजी (एस.आर.पी.एफ.), यांनी या उपक्रमाबाबत मत व्यक्त केले की, रत्नानिधीची ही सेवा परिपूर्ण अशी आहे. पोलिस कर्मचार्‍यांची केवळ नेत्रतपासणी न करता त्यावरील खबरदारीचा उपाय म्हणून चष्म्यांचे मोफत वितरणही या संस्थेद्वारे करण्यात येत आहे. आमच्या पोलिस कर्मचार्‍यांसाठी ही फार मोठी गोष्ट असून महाराष्ट्राच्या पोलिस दलातील सव कर्मचार्‍यांना याचा लाभ घेता यावा याबाबत आम्ही विचार करत आहोत.
व्हिजन१०००० या उपक्रमांतर्गत व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया, बाबुलनाथ यांच्या सहकार्याने रत्ना निधीद्वारे भविष्यात गरजूंकरिता नेत्र मोतीबिंदू ऑपरेशनची मोफत सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

वीर लान्स नाईक संदीप सिंग शहीद

national news
जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधर सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना ...

चंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा

national news
मुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा ...

गूगल सर्च होणार आणखी सोपे

national news
सॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही ...

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत नवा इतिहास

national news
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत आपल्या ...

राहूल हाच मोदींना पर्याय...

national news
कौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का? असा प्रश्न ...