शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

मुलांना का आवडतात कमी उंचीच्या मुली?

उंची कमी असल्याने अनेक मुलींना असे वाटते की कोणताही मुलगा त्यांना पसंत कऱणार नाही. तुम्हीही असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय. कारण नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार मुलांना कमी उंचीच्या मुली अधिक आकर्षित करतात.
 
युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्‍सासमध्ये याबाबतचे संशोधन करण्यात आले. कमी उंचीच्या मुलींचा स्वभाव रोमॅंटिक असतो. अशा मुली आपल्या जोडीदाराला अधिक खुश ठेवतात. कमी उंचीच्या मुलींनी हिल्स घातल्यास त्या अधिक सुंदर दिसतात. त्यांची पर्सनॅलिटी चांगली वाटते. यामुळेच पुरुष अशा मुलींकडे अधिक आकर्षित होतात असे या संशोधनात सांगण्यात आले आहे.