testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चीनमधील बुटक्यांचे गाव

china dwarf
लहानपणापासून आपण हिमगौरी आणि सात बुटके ही कथा ऐकत आलो आहोत. प्रत्यक्षातही कांही वेळा आपण एकदम ठेंगू माणसे पाहतो. पण हे प्रमाण फारच कमी असते. आकडेवारीनुसार दर २० हजार माणसांमागे एखादा बुटका असू शकतो. चीनच्येा शिचुआन प्रांतातील यान्सी हे गाव मात्र बुटकयांचे गांव म्हणूनच जगाच्या नकाशावर आले आहे. विशेष म्हणजे हे गांव पन्नास साठ वर्षांपूर्वी नॉर्मल माणसांचे गांव होते मात्र येथे आलेल्या एका रोगाच्या साथीमुळे येथील मुलांची उंची ७ वर्षांनंतर वाढत नसल्याचे व त्यामुळे हे बुटक्यांचे गांव बनल्याचे सांगितले जाते.
या गावातील लोकांची उंची २ फूटांपासून ते ३ फूट १० इंचापर्यंतच वाढते. मूल पाच ते सात वर्षाचे झाले की त्याच्या उंचीची वाढ थांबते.
१९५१ मध्ये उंची वाढायची थांबल्याची पहिली केस लक्षात आली हेाती. कांही लोकांच्या मते येथे आलेल्या एका रोगाच्या साथीचा हा परिणाम आहे तर कांहीच्या मते जपानने येथे विषारी वायूचा प्रयोग केल्यामुळे असे झाले आहे. येथील माती, पाणी, हवा, अन्नधान्य यांच्या अनेकदा तपासण्या केल्या गेल्या आहेत मात्र उंची वाढ थांबण्यामागचे कारण शोधता आलेले नाही. सध्या या गावातील निम्मी जनता बुटकी आहे.
विशेष म्हणजे चीन सरकारने या भागात परदेशी पत्रकारांना जाण्यास मज्जाव केला आहे.


यावर अधिक वाचा :