testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मेलेल्या पाळीव मांजरीचे ड्रोन

cat drone
आपल्या मेलेल्या पाळीव मांजरीची स्मृती कायम राहावी, यासाठी एका डच कलाकाराने तिला ड्रोन बनविले. यातून तांत्रिक प्रगतीचा विचित्रपणा जगासमोर आणण्याचा आपला हेतू असल्याचे त्याने सांगितले आहे.
या कलाकाराची ऑर्विल नावाची पाळीव मांजर होती. कारखाली सापडून ती मेली तेव्हा तिची आठवण कायम राहावी, अशी त्याची इच्छा होती. जेन्सेन याला मेलेली जनावरे जतन करून ठेवायची आधीपासून आवड होती. त्यामुळे या मांजरीला ड्रोन बनवायचे त्याने ठरवले.
"विमानाच्या संशोधक बंधूपैकी एक ऑर्विल राईट याच्या नावावरून ऑर्विलचे नाव ठेवण्यात आलेहोते. त्याला पक्ष्यांचीही आवड होती. म्हणून त्याच्या मृत्यूनंतर आम्ही त्याला उडविण्याचे ठरविले," असे जेन्सेनने 'डॉयट्शे वेले'ला सांगितले.

याकामी आपला मेकॅनिकल अभियंता मित्र आर्जेन बेल्टमॅन याची जेन्सेनने मदत घेतली. या दोघांनी मिळून ऑर्विलकॉप्टरची निर्मिती केली आहे. त्यानंतर त्यांनी शार्क आणि उंदराचेही ड्रोन बनवले आहेत. यानंतर हॉलंडमधील एका शहामृग फार्मधूनही त्यांना मागणी आली. या फार्ममधील एक शहामृग मेला होता. त्याचाही ड्रोन या दुकलीने बनवला आहे.
तांत्रिक प्रगतीचा अट्टाहास आणि उपभोगाची अथक लालसा यांतील फोलपणा अधोरेखित करण्यासाठी आपले आविष्कार असल्याचा जेन्सेन याचा दावा आहे.


यावर अधिक वाचा :