बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 29 मे 2017 (14:12 IST)

इसेन्स आणि 'नाशिक रन' या स्वयंसेवी संस्थेने केली हात मिळवणी

इसेन्स लर्निंग प्रा. लि. हि संस्था नवनीत एजुकेशन कंपनीची डिजिटल क्षेत्रातील  भगिनी संस्था आहे.इसेन्स आणि 'नाशिक रन' या एनजीओच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक शिवाजी नगर येथील २ मनपाशाळांमध्ये डिजिटल कलासरूम्स सुरु करण्यात आल्या. शाळांमध्ये अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान सुविधा उपलब्धकरून देण्याच्या मोहिमेत आतापर्यंत नाशिक मधील १४ शाळांना लाभ झाला आहे.
 
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याच्या उद्देशाने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटीकार्यक्रमांतर्गत 'नाशिक रन' एनजीओसाठी इसेन्सने हा पुढाकार घेतला. समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकूवतघटकांतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण प्रदान करण्यासाठी इसेन्स नेहेमीच प्रयत्नशीलराहिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम पूढे नेऊन आणखी अनेक शाळांमध्ये डिजिटल कलासरूम्सचीसुविधा उपलब्ध देऊ करण्याचा इसेन्सचा मानस आहे.
 
या कार्यक्रमाला श्री. एच.एस. बॅनर्जी- अध्यक्ष, नाशिक रन एनजीओ, श्री. एच. बी. तोंतेश- उपाध्यक्ष, नाशिक रन,श्री.नितीन उपासनी-शिक्षण अधिकारी नाशिक महानगरपालिका, श्री. प्रतीक मनोहर- नवनीत एजुकेशन, श्री.वेंकटअहिरे नवनीत एजुकेशन प्रा. लि. आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
ई -सेंस बद्दल- 
ई -सेंस एक झपाट्याने वाढणारी डिजिटल एजुकेशन कंपनी आहे. या कंपनीने भारतात शाळांना आणिविदार्थ्यांसाठी ई -लर्निंग साधन प्रदान करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. प्रभावी आणि अभिनवपद्धतीने विदार्थ्यांना पाठ्यक्रमाशी जोडणे हा ईसेंसचा मुख्य उद्देश्य आहे. ईसेंस अभियांत्रिकी समाधान शिक्षणआणि शिकण्याचा अनुभव समृद्ध करतो. इथे चॉक पेक्षा पलीकडे जाऊन शिकण्याच्या वातावरणाची निर्मिती केलीजाते. शिकण्यासोबत तंत्रज्ञानाचा उपयोग यांना एकीकृत करण्यावर आमचा भर आहे.