testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वयस्कर पित्याची मुले निघतात तल्लख बुध्दीचे

kids father
वयस्कर पित्याच्या पोटी येणारी अपत्ये अधिक बुध्दीने तल्लख निघण्याची शक्यता असते. आपल्या आवडींवर त्यांचे लक्ष केंद्रित असते व समाजासोबत जुळवून घेण्याची फारसी चिंता त्यांना नसते, असा खुलासा एका ताज्या अध्ययनातून झाला आहे.
याआधीच्या अध्ययनामध्ये वयस्कर पित्याच्या मुलांमध्ये ऑटिज्म व सिजोफ्रेनियासारख्या समस्यांनी जास्त जोखीम असते, असे म्हटले होते. मात्र नव्या संशोधनात या मुलांमध्ये शै‍क्षणिक व करिअरच्या प्रगतीच्या दिशेने काही लाभही असतात, असे आढळून आले. ब्रिटनमधील किंग्ज कॉलेज लंडनच्या शास्त्रज्ञांनी 15 हजार जुळ्या मुलांचा वर्तन व संज्ञानात्मक डाटा गोळा केला. ही जुळी 12 वर्षांची होती तेव्हा गैरमौखिक बुद्ध्यांक, आपल्या आवडीनुसार संपूर्ण लक्ष आणि सामाजिक अलिप्ततेची स्थिती यासंबंधीची ऑनलाइन चाचणी त्यांनी पूर्ण केली.
अशी मुले शालेय अभ्यासात खासकरून विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग व गणित या विषयात चांगली कामगिरी करतात. हे निष्कर्ष पित्याचे वय, आत्मकेंद्रितपणा व गुणवैशिष्टये यांच्यातील संबंध समजण्यासाठी मदत करतात.

अर्थात शास्त्रज्ञ याची थेट नोंद घेऊ शकले नसले तरी जी जनुके ऑटिज्मसाठी मात करणारी ठरतात, ती त्यांच्या पित्यामध्ये असण्याची जास्त शक्यता असते, असे किंग्ज कॉलेज लंडनच्या मग्दालेना जानेका यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :