Widgets Magazine
Widgets Magazine

खारीच्या उडणार्‍या प्रजातीचा शोध

flying Squirrel

उत्तर अमेरिकेमध्ये शास्त्रज्ञांना उडणार्‍या खारूताईच्या एका नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. ही शेकडो वर्षांपासून नजरेआड होती. हम्बोल्ट्स वा ग्लुकोमीस ओरेगोन्सिस नावाने ओळखल्या जाणार्‍या या अनोख्या वैशिष्टांच्या खारीचे उत्तर अमेरिकेतील प्रशांत महासागराच्या किनार्‍यावर वास्तव्य आहे.
 
वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्राध्यापक जीम केनाजी यांनी सांगितले की मायटोर्कोड्रियल डीएनएमध्ये शास्त्रज्ञांना आण्विक जिनोम दिसेपर्यंत गेली 200 वर्षे वायव्य अमेरिकेत उडणार्‍या खारीची केवळ एकच प्रजात असल्याचे समजले जात होते. हे एक आश्चर्यकारक संशोधन आहे. उडणारी हम्बोल्ट्स खार एक गुप्त प्रजात समजली जाते.
 
ही प्रजात पूर्वी अन्य प्रजातीच्या रूपात ओळखली जात होती. कारण दोन्ही दिसायला एकसारख्या आहेत. या नव्या हम्बोल्ट्स खारीचा शोध जगातील खारीची 45 वी प्रजात समजली जात आहे. उत्तर व मध्य अमेरिकेमध्ये उडणार्‍या खारीच्या दोन प्रजाती आहेत. त्या सगळ्या छोट्या असून त्यांचा जंगलांमध्ये वावर असतो.
 
या खारी वास्तवात वटवाघुळे वा पक्षांप्रमाणे उडत नाहीत. त्याऐवजी आपल्या केसाळ त्वचेचा पडदा पसरवून या झाडावरून त्या झाडावर जातात. त्यांची पंखासारखी शेपटी पुढे सरकण्यास व वळण घेण्यासही मदत करते. या खारीची सरकत जाण्याची क्षमता विलक्षण असून ती शंभर मीटरपर्यंत वेगाने सरकत जाऊ शकते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आज-काल

news

येथे चार नंबर आहे मृत्यूचा आकडा

प्रगत मानला जाणारा दक्षिण कोरिया हा देश अजबगजब देश आहे. येथील नागरिक अंधश्रद्धाळू आहेत व ...

news

काय माश्यांनाही ओठ असतात?

हिंदी महासागरामध्ये शास्त्रज्ञांनी एक अनोख्या माशाचा शोध लावला असून त्याला चक्क ओठ आहेत. ...

news

मुक्तचा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाशी करार

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, ...

news

आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस

चहा हे असं पेय आहे. जे झोपडीतल्या गरिबापासून ते पंचतारांकित हॉटेलातल्या श्रीमंतापर्यंत ...

Widgets Magazine