बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

खिशात मावणारे फुगा हेल्मेट

दुचाकी वाहन चालविताना भारतात हेल्मेट वापरणे बंधनकारक केले गेले आहे. वाहन चालविताना छोटा मोठा अपघात झाला तर त्यात डोके सुरक्षित राहावे यासाठी हेल्मेट वापरणे केव्हाही श्रेयकर असले तरी हे हेल्मेट बरोबर बाळगणे मात्र जिकीरीचे होते. हेल्मेट सांभाळण्याची ही समस्या आता संपणार आहे कारण पँटच्या खिशात सहज मावेल असे हेल्मेट तयार करण्यात आले आहे.
 
स्पेनमधील क्लोस्का कंपनीने हे फोल्डेबल हेल्मेट तयार केले आहे. बाईक चालविताना ते वापरल्याने डोक्याचे संरक्षण होणार आहेच पण वापर संपल्यावर ते फोल्ड करून खिशातही सहज ठेवता येणार आहे. फोल्ड झाल्यावर ते सीडीच्या आकाराचे बनते. या हेल्मेटचे नामकरण फुगा असे केले गेले आहे. तीन तुकड्यात हे हेल्मेट असून पूर्ण उघडले की ते हेल्मेट बनते. हेल्मेटच्या टॉपवर दाबले की ते फोल्ड होते. याची सध्याची किंमत १०० डॉलर्स म्हणजे ६३०० रूपये आहे. या हेल्मेटच्या वापराला अमेरिकेने परवानगी दिली असल्याचेही समजते.