Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

भारतीय संशोधकांनी लावला नव्या आकाशगंगेचा शोध

galaxy

भारतीय संशोधकांनी एका नव्या आकाशगंगेचा शोध लावला आहे. याचे नामकरण त्यांनी 'सरस्वती' असे केलं आहे. आपल्या आकाशगंगेपासून सुमारे चार अब्ज प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या दीर्घिकांचा (गॅलेग्झी) अतिशय घन असा महासमूह (सुपरक्लस्टर) भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी शोधला आहे. पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या (आयुका) पुढाकाराने हे संसोधन केल्याचे समोर आले आहे.

अमेरिकन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या द अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल या शोधपत्रिकेत 19 जुलै रोजी हे संशोधन प्रसिद्ध होणार आहे.

दीर्घिकांच्या या महासमूहाची व्याप्ती 60 कोटी प्रकाशवर्षे इतकी आहे. विश्वाच्या निर्मितीनंतर दहा अब्ज वर्षांनी सरस्वती समूहाची असणारी अवस्था सध्या आपल्याला दिसत आहे असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.यावर अधिक वाचा :