शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

झोपेत झाली प्रसूती

लंडन- आई बनताना प्रसव पीडा प्रत्येक महिलेसाठी मोठे आव्हान असतं परंतू ब्रिटनच्या डर्बीशायर येथे राहणार्‍या 23 वर्षाच्या एलिस पायनेला या वेदना जाणवल्याच नाही. ती झोपेतच आई झाली आणि जेव्हा डोळे उघडले तोपर्यंत मुलं जन्माला आलेले होते.
 
द सन बातमीप्रमाणे एलिसला 18 डिसेंबर रोजी रॉयल डर्बी रूग्णालयात भरती करवण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला तपासले परंतू या दरम्यान एक चूक झाली परिणामस्वरूप कॉन्ट्रेक्शन मॉनिटर गर्भाच्या आकुंचनाचा अंदाज बांधण्यात चुकला. नंतर डॉक्टरांनी एलिसला झोपेसाठी काही औषधं दिली. औषधं घेतल्याच्या 30 मिनिटानंतरच तिचं शरीर प्रसूतीसाठी तयार झाले परंतू तेव्हा डॉक्टर्स घाबरले. एलिसची गाढ झोपी तर नाही गेली याची त्यांना काळजी वाटू लागली. डॉक्टरांना तिला जागं करण्यात यश मिळेपर्यंत तिचा मुलगा फिलिप जन्माला येऊन गेला होता.