बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जानेवारी 2020 (11:10 IST)

महात्मा गांधी पुण्यतिथी विशेष

महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे एक सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते. ह्यांचे वडील पोरबंदर आणि राजकोट संस्थानाचे दिवाण होते. ह्यांच्या घरात धार्मिक वातावरण होते. ह्यांचा मनांवर धार्मिक विचार लहानपणा पासूनच बिंबित होते. 
 
हरिशन्द्र नाटक त्यांचा आवडीचे होते. ते या नाटकाला वारंवार बघायचे. त्यांचा मनात अहिंसात्मक सत्याग्रहासाठी लागणारी निष्टेची भूमिका लहानपणापासूनच मनात रुतली होती. ह्यांचे लग्न कस्तुरबा यांचा बरोबर झाले. त्यावेळी या दोघांचे वय निव्वळ 13 वर्षाचे होते. त्यावेळी हे शिकत होते. त्यांना एकूण 4 अपत्ये झाले. 
 
'महात्मा' या नावाने ते जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांनी शेतकऱ्यांचा हक्कासाठी, मीठ सत्याग्रह, सविनय कायदाभंग, व्यक्तिगत सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व केले. थोर गरिबांसाठी ह्यांना हळहळ वाटत असे. हरिजनांच्या हक्कासाठी हे लढले. अस्पृश्यतेच्या विरोधात असे यांनी आजीवन अहिंसेचा मार्ग पत्करला. हे अहिंसेचे महान प्रवर्तक होते. ह्यांच्या मताचे विरोधकाने यांची हत्येचा कट रचला होता. ह्यांचा मृत्यूच्या 10 दिवसाआधी यांचा प्रार्थना सभेत बॉम्ब फेकून यांची हत्या करण्याचा कट रचला होता पण त्यात मारकरींना यश आले नाही. त्या दिवशी सभेला संबोधित करत असताना त्यांचा माईकचा आवाज व्यवस्थित न येण्याने त्यांची एक अनुयायिका सुशीला अय्यर हे त्यांच्या वाक्याचे पुरारुच्चारण करत होत्या. तेवढ्यात विस्फोटाची आवाज आली. सगळी कडे धांदळ उडाली. 
 
पण बापू अप्रभाषितच राहिले. त्यादिवशी मारकऱ्याने लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हे स्फोटाचे कट रचवून आणले होते. मारेकऱ्यांचा योजनेनुसार बापूच्या नौकराच्या खोलीतून बापूंवर बॉम्ब फेकण्याचा कट होता पण त्यात ते अयशस्वी झाले. 
 
नाथूराम गोडसे, नारायण आपटे, विष्णू करकरे, गोपाळ गोडसे, दिगंबर बाजे आणि शंकर किस्त्यात हे मारेकरी टॅक्सीतून पळून गेले. पण त्यांचा एक साथीदार मदनलाल पाहवा मारण्याच्या कटासाठी पकडला गेला. 
 
20 जानेवारीला प्रार्थना सभेत बापू पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांचातील मतभेदांविषयी चर्चा करीत होते. ते म्हणाले की सरदार पटेलांच्या विधानाचे काळजीपूर्वक विचार केल्याने लक्षात येते की यांचा दोघांमध्ये मतभेद नसून त्यांची विचारसरणी वेगळी असून त्यांचे काम एक सारखेच आहे. 30 जानेवारी 1948 रोजी प्रार्थने सभेत नाथूराम गोडसे यांनी महात्मा गांधी ह्यांच्या वर जवळून 3 गोळ्या झाडल्या आणि त्यांची हत्या केली. खाली पडताना गांधीजींना मुखातून शेवटी" हे राम" हे शब्द निघाले. आणि 
त्यांनी प्राण सोडले. 20 जानेवारीच्या घटनेचा गांभीर्याने विचार केला असता, तर कदाचित बापूंनी आपल्याला असे निरोप दिले नसते.