testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुंबईचा धोबीघाटाची वार्षिक उलाढाल तब्बल 100 कोटी

dhobi ghat
मोकळ्या आकाशाखालची सर्वात मोठी लाँड्री अशी ओळख असलेल्या मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील १२५ वर्षे जुन्या धोबीघाटाची वार्षिक उलाढाल तब्बल १०० कोटींपेक्षा अधिक असल्याचे धोबी कल्याण व आद्योगिक विकास को.ऑप. सोसायटीचे म्हणणे आहे.
ब्रिटीश काळात १८९० साली निर्माण केल्या गेलेल्या या धोबीघाटावर दररोज ७००० धोबी कपडे धुणे, वाळवणे, डाय करणे व प्रेस करणे अशी कामे दिवसातले १८ ते २० तास करत असतात. आज दिलेले कपडे दुसरे दिवशी शहराच्या विविध भागातील ग्राहकांपर्यंत स्वच्छ करून पोहोचविणे हे काम गेली १२५ वर्षे अव्याहत सुरू आहे व तेही वेळ न चुकविता.

धोबी असोसिएशनचे मनुलाल कनोजिया सांगतात या घाटावरील श्रीमंत धोब्यांनी आता हाताने कपडे धुणे वाळविण्याऐवजी मोठ मोठी मशीन्सच येथे लावली आहेत.

मात्र आजही हाताने कपडे धुणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. येथे सरासरी दररोज १ लाख कपडे धुतले जातात. आजकाल घराघरातून व मोठमोठ्या हॉटेल्समधून वॉशिंग मशीन्स आली असली तरी धोब्यांच्या व्यवसायावर त्याचा कांहीही परिणाम झालेला नाही. लाँड्रीत १ पँट अथवा साडी धुवायला ५० रूपये द्यावे लागतात ते काम आम्ही चार ते पाच रूपयांत करतो. प्रत्येक धोबी दिवसाला किमान ४०० साड्या धुवत असतो. शिवाय ग्राहकाला दुसर्‍या दिवशी कपड्यांची डिलिव्हरी मिळणार याची खात्री असते. आमच्या या घाटाचे नांव गिनीज बुकमध्येही नोंदविले गेले आहे.
मुंबईचा धोबीघाट हा परदेशी पर्यटकांचेही विशेष आकर्षण आहे. दिवसभरात येथे अनेक परदेशी पर्यटक येतात, दिवसभर फिरतात. येथील घाणीबद्दलही धोबीघाट प्रसिद्ध असून मलेरिया व डेंग्यूचे सर्वाधिक रूग्ण याच भागात सापडतात असेही समजते.


यावर अधिक वाचा :

जगातील सर्वोत्तम लढाऊ विमान

national news
लॉखिद मार्टीनचे हे विमान रडारांसाठी अदृश्य असतं. या सर्वाधिक आधुनिक, महाग आणि उन्नत लढाऊ ...

मी ती मुलाखत चोरूनसुद्धा पाहिली नाही - उध्वव ठाकरे

national news
महामुलाखत काय ते माहित नाही तर मी ती मी ती मुलाखत चोरूनसुद्धा पाहिली नाही असे उद्धव ...

शेतकरी व बेरोजगारांच्या समस्या सोडवेपर्यंत हल्लाबोल सुरूच ...

national news
उत्तर महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाचा शेवटचा दिवस आणि शेवटची म्हणजेच एकविसावी सभा चाळीसगाव ...

आई शप्पथ मला ठाण्यात रहायचे नाही: संजीव जयस्वाल

national news
एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने भावनिक आवाहन केल्याची प्रथमच वेळ असावी, कारण ठाण्याचे मनपा ...

परळीत शिवसेना उमदेवार देणार

national news
मुंडे बंधू-बघिनी मुले परळी नेहमीच चर्चेत असते. मात्र यामध्ये गोपीनाथ मुंडे असल्याने ...

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

नोकिया 6चं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च

national news
एचएमडी ग्लोबलने नोकिया 6 या फोनचं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. हा स्मार्टफोन ...

‘अॅपल’ च्या जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला

national news
‘अॅपल’ च्या एका जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला आहे. खुद्द रहमाननेच ट्विट करत ...

1 जुलैपासून 13 अंकांचे होतील मोबाईल नंबर

national news
नवी दिल्ली- 1 जुलै 2018 नंतर आपण मोबाईल नंबर घेत असाल तर आपल्याला दहा ऐवजी 13 अंकांचा ...

म्हणून ट्विटरच्या टीमने घेतली अमिताभ यांची भेट

national news
काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून काढता पाय घेण्याचा इशारा दिला ...