गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

संपूर्ण शहरात राहतो एकच व्यक्ती

एका संपूर्ण शहरात फक्त एक व्यक्ती राहत असल्याचे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला ते खरे वाटणार नाही. पण हे सत्य आहे. जपानच्या तोमिओका शहरात एकच व्यक्ती राहतो. संपूर्ण शहरात हा एकमेव व्यक्ती राहतो, यामागे काय कारण आहे.  ते आज आम्ही तुम्हाला सांगतो.
 
मीडिया रिपोर्टनुसार जपानच्या तोमिओकामध्ये 2010 मध्ये सुमारे 15 हजार लोक राहत होते. पण त्सुनामी आली आणि फुकूशिमा दायची न्युक्लिअर प्लांटमध्ये गळती सुरू झाली. त्यामुळे येथे रेडिएशन वाढले. या रेडिएशनचा परिणाम तोमिओका शहरावरही जाणवला. रेडिएशनच्या भीतीने येथून सर्व लोक पळून गेले. पण 58 वर्षांचे नाओतो मत्सुमुरा एकटेच या शहरात राहिले. ज्यांनी या शहरातून जायला नकार दिला. त्यांना शहरातील जनावर आणि प्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था करायची होती. त्यामुळे एकटेच या शहरात राहिले.
 
एका मुलाखतीत मत्सुमुरा म्हणाले, जेव्हा भूकंप आला तेव्हा मी काम करत होता. त्यांना समजले की त्सुनामी येणार आहेत त्यामुळे ते घरी पोहचण्यापूर्वी त्सुनामीची वाट पाहत होते. दुसर्‍या दिवशी न्युक्लीअर प्लांटमध्ये स्फोट झाल्याचा त्यांना आवाज आला. 
 
हा खूप मोठा स्फोट होता. या घटनेनंतर एक संपूर्ण शहर रिकामे झाले. लोकांनी या शहराला सोडले आणि दुसरीकडे राहयला गेले. मत्सुमुरा पण या दरम्यान इवाकीमध्ये आपल्या काकूच्या घरी गेले होते. पण त्या ठिकाणी त्यांना राहण्याची परवानगी मिळाली नाही. तेथील लोकांचे म्हणरे होते की ते लोक दूषित झाले आहेत.
 
एका रिपोर्टनुसार मत्सुमुरा यांच्या कुटुंबातील लोक तोमिओका शहरापासून 18 मैल दूर आपल्या नातेवाईकांकडे राहत आहे.