testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

या शहरात मरण्यावर बंदी

no death policy
जीवन आणि मृत्यू हे सर्व देवावर अवलंबून आहे आणि कुणाचे प्राण कधी सुटतील हे कुणालाही माहीत नसतं. परंतू आपल्या हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल की एक शहर असेही आहे जिथे मरण्यावर बंदी आहे. अर्थात तुम्हाला येथे मरण्याची परवानगी नाही.

नॉर्वे येथील लॉन्गेयरबेन शहरात माणसांच्या मरण्यावर बंदी आहे. ही बाब आपल्या विचित्र वाटत असली तरी यामागील कारण जाणून घेतल्यावर आपणही या बंदीला विरोध करणार नाही. येथे कुणीही मरण पावू शकत नाही, मरण्यापूर्वी लोकांना येथून बाहेर काढलं जातं. आता आम्ही आपल्या सांगू काय आहे यामागील कारण.

सुमारे दो हजाराची लोकसंख्या असलेल्या या शहरात सतत रक्त गोठवणारा गारठा पसरलेला असतो. येथे राहणारे लोकं पर्यटक किंवा संशोधकच असतात. चारीकडे बर्फ पसरलेला असतो आणि हेच कारण आहे की येथे ट्रांसपोर्टेशनसाठीही केवळ स्नो स्कूटर वापरण्यात येतं. येथे वर्षातून चार महिन्यापर्यंत सूर्याचे दर्शनदेखील होत नाही आणि 24 तास अंधार पसरलेला असतो.
शहरात एक लहानशी दफनभूमी आहे जिथे मागील 70 वर्षांपासून कुणालाही दफन करण्यात आलेले नाही. खरं म्हणजे अती थंडी आणि बर्फात दबलेली असल्यामुळे येथील प्रेत जमिनीत नष्ट होत नाही आणि कुजतदेखील नाही. अनेक वर्षांपूर्वी संशोधकांनी येथील दफनभूमीतून एक डेड बॉडीचे टिशूचे नमुने घेऊन तपास केली तर त्यात इन्फ्लूएन्झाचे व्हायरस आढळले. तेव्हापासून येथे 'नो डेथ पालिसी' लागू करण्यात आली.
येथे कुण‍ीही गंभीरपणे आजारी पडल्यावर किंवा मरणासन्न झाल्यावर त्याला प्लॅन किंवा शिपमध्ये बसवून नॉर्वेच्या दुसर्‍या भागात पाठवण्यात येतं.


यावर अधिक वाचा :