गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

इंडोनेशियात लोकं राहतात नग्न

इंडोनेशिया येथे एक समुदाय असा आहे जे कायद्याला खिशात घालून नग्न राहतात. येथे सार्वजनिक रूपात नग्न राहण्यावर कठीण मनाही आहे. बीबीसी इंडोनेशियाच्या बातमीदार कलर रोंडोनुवु यांनी या समुदायाच्या काही लोकांची भेट घेऊन त्याच्या जीवनशैलीला समजण्याचा प्रयत्न केला.
 
या समुदायाचे आदित्यच्या शरीरावर एक दोरादेखील नाही. ते जेवण तयार करताना फ्राइंग पॅनच्या गरम तेलाचे काही थेंब त्यांच्या पोटावर पडतात. ते म्हणतात मला नागडे राहून काम करणे आरामदायक वाटतं आणि मी खूश राहतो.
 
या देशात हे कायद्यात बसत नाही म्हणून आदित्य यांनी आपले पूर्ण नाव सांगितले नाही. इंडोनेशिया येथे अँटी-पोर्नोग्राफी कायदा आहे ज्याअंतर्गत सार्वजनिक स्थळी नग्न होणे गैरकायदेशीर आहे. आदित्या आपल्यासारखे नागडे राहणार्‍या चार मित्रांना खासगी भेट देतात कारण त्याच्याप्रमाणे सार्वजिनक असे भेटल्यास त्यांना जेल होऊ शकते.
 
एकमेकांशी जवळीक
10 वर्षांपासून आदित्य या अवस्थेत राहतात. त्यांनी सांगितले की मी इंटरनेटवर लेख वाचत असताना जाणवले की मी ही याच शोधात होतो. नंतर आदित्य यांनी नग्न राहणार्‍या लोकांशी संपर्क केला. हा समूह लहान असला तरी सगळे एकमेकांच्या खूप जवळ आहे. जकार्ताच्या नेचुरिस्ट समूहात 10 ते 15 लोकं सामील आहेत. ज्यात महिलादेखील आहेत. आदित्यप्रमाणे नग्न राहण्याने त्याचे संबंध मजबूत होतात.
 
त्याच्याप्रमाणे आपण जसे दिसतात मग ते जाड असो वा पातळ, आपल्या शरीराचा मजाक कोणीही उडवत नाही. आपल्या लिंग आणि ब्रेस्टचा आकार किंवा जन्मखूणांबद्दल थट्टा केली जात नाही. आदित्य यांना तर फ्रान्स सारख्या देशाची यात्रा करायची इच्छा आहे जिथे नग्न राहणार्‍यावर कुठलीही बंदी नाहीत.
 
इंडोनेशिया येथे कठीण कायदा असला तरी हे लोकं सुट्ट्यांचा आनंद घेत असतात. अलीकडेच ते एका हिल स्टेशनावर गेले होते आणि तिथे पोहचल्यावर काही मिनिटात त्यांनी सर्व कपडे काढून फेकले. ते म्हणाले आम्ही दिवसभर गप्पा मारल्या, आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा रंगवली.
 
सोशल मीडियावर नग्न जीवनशैलीची पोस्ट
आदित्य सार्वजनिकपणे आपल्या मित्रांशी भेटत नसले तरी आपल्या जीवनशैलीबद्दल न्यूडिस्ट वेबसाइट्सवर उघडपणे लिहितात. ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करतात. एका फोटोत तर ते चर्चमध्ये पूर्ण नग्न अवस्थेत उभे दिसत होते. नंतर तो अकाउंट डिलीट करण्यात आला कारण त्यांना अँटी-पोर्नोग्राफी कायद्याअंतर्गत अटक झाली असते.
 
ते सांगतात की माझे साथी मी बेजबाबदार समजतात की मी इंटरनेटवर असे फोटो पोस्ट करत असतो. परंतू माझ्या जीवनशैलीबद्दल लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी हे गरजेचं आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. अनेक लोकं नग्नतेला सेक्सशी जुळवून बघतात परंतू प्रत्यक्षात असे काहीही नाही.
 
उच्च वर्गात नग्नता सहज
बोर्नेओ रहिवासी नेचुरिस्ट यांनी आपली ओळख लपवत सांगितले की इंडोनेशिया येथे नग्न जीवनशैली अमलात आणणं एक अवघड निर्णय आहे. त्यांना फ्रान्स आणि जर्मनी सारख्या देशांचा हेवा वाटतो जिथे नग्नता सहज स्वीकारली गेली आहे. इंडोनेशिया येथे बाली हे स्थळ त्यांचे आवडते आहे कारण येथे सक्तीत जरा सूट आहे. पण येथील रिसॉर्ट परदेशींना सेवा देत आहे. 40 वर्षांपूर्वी बाली सारख्या जागांवर नग्नता सामान्य गोष्ट होती. आता येथे असे बीच नाही जिथे नग्न अवस्थेत फिरता येऊ शकतं परंतू न्यूडिस्ट लोकांना पसंत पडणारे काही कोस्टल क्षेत्र आहेत.
 
बाली येथील एक रिसॉर्टचे मॅनेजर सांगतात की येथे दोन रिसॉर्ट असे आहे जिथे कपडे घालणे अनिवार्य नाही. तसेच अनेक हॉटेल हे स्वीकारत नाही पण परदेशी पर्यटक येथे नग्न होतात आणि उच्च वर्गात हे अगदी सामान्य आहे.
 
समाजाने अश्या लोकांना इतर सामान्य लोकांप्रमाणे समजावं अशी आदित्य यांची इच्छा आहे. ते म्हणतात की अनेक लोकं आम्हाला बघून आक्रमक होऊन जातात, काही लोकं आम्हाला जनावर म्हणून ही हाक मारतात. खरं बघायला गेलो तर आम्ही तेच आहोत आणि त्यात काहीच वाईट नाही. पण आम्ही कोणालाही नुकसान करत नाही.
 
सोशल मीडियाच्या मदतीने याबद्दलचे सर्व गैरसमज दूर व्हावे अशी त्यांची इच्छा असली तरी इंटरनेट ट्रोल्सपासून वाचणे तेवढे सोपे नाही हेही ते जाणून आहे.