शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

किती टक्के लोक नियमित परफ्यूम वापरतात?

आपल्या शरीरात सुगंध येण्यासाठी प्रत्येक जण काही न काही प्रयत्न करत असतो. पण देशातील केवळ 30 टक्के लोक दररोज परफ्यूमचा वापर करतात, तर अनेक जण परफ्यूमच्या महागड्या किमतीमुळे वापर टाळत असल्याचे एका सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे.
 
दररोज परफ्यूमचा वापर करत असल्याचे 30 टक्के लोकांनी सांगितले, तर उर्वरित 70 टक्के लोकांनी कधी तरी परफ्यूमचा वापर करतो असे सांगितले. मात्र परफ्यूमच्या किमती कमी असतील तर दररोज वापर करू, असेही या सर्वेक्षणामध्ये महटले आहे.
 
भारतातील परफ्यूमचा वापर असा एक रिपोर्ट सिंथॉल डियोस्टीकने एसी निल्सनसह जारी केला आहे. यामध्ये उत्तर भारत, पश्चिम भारत आणि दक्षिण भारतातील तरूणांशी आणि महिलांशी बॉडी स्मेल आणि परफ्यूमच्या वापरावर चर्चा करण्यात आली.