testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुंबई आणि राज्यात २०१७ मध्ये जोरदार पाऊसाची हजेरी

mumbai rain
Last Updated: शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (16:12 IST)
या २०१७ वर्षातील पावसाला हा मुंबई आणि राज्यातील अनेक भागांसाठी फार त्रासदायक ठरला आहे. यावर्षी पाऊस झाल्याने मात्र राज्यातील अनेक धरणे भरली आहेत. तर जवळपास १४ वर्षांनी मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण जायकवाडी हे पूर्ण क्षमतेने भरले आहे, जायकवाडी हे राज्यातील सर्वात मोठे धरण आहेत.
सप्टेंबर महिन्यात पावासने मुंबईला अक्षरक्षह झोडपून काढेल होते. मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून लोकस सेवा उशिराने सुरू आहे.तर दुसरीकडे येत्या २४ तासांत मुंबईसह, उत्तर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे.

मुंबईतल्या पावसामुळं हिंदमाता, दादर, परेल, कुर्ला परिसरात पाणी भरलं होते. पाणी न ओसरल्याचं चित्र पाहायला मिळत होते. प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यामुळे अनेकदा विस्कळीत झाली होती.त्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. २७ ऑगस्टपर्यंतचा गेल्या वर्षी १९३० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी २०१७ मध्ये
२३१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं. अनेक लोक वाहनं रस्त्यावर सोडून चालत घरी निघाले होते. बॉम्बो हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकरही दुपारी प्रभादेवीला आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले होत आणि ते पाणी जाण्यासठी उघडलेल्या ड्रेनेज मध्ये
घसरले आणि वाहून गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी झालेल्या जोरदार वा-यासह आलेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले. बुधवारी सकाळी पावसाचा जोर जरा कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, दिवसभर झालेल्या पावसाने अनेकांना २६ जुलैची आठवण करून दिली.ऑगस्ट मध्ये दिवसभरात केवळ आठ तासात ४१६.६ मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मान्सूनचा हा रेकॉर्डब्रेक पाऊस झाला होता.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

२०१४ प्रमाणे शिवसेनेनं महायुतीत यावे : रामदास आठवले

national news
भाजपनं आपसातील भांडण थांबवावे. २०१४ प्रमाणे शिवसेनेनं महायुतीत यावं. अन्यथा त्याचा ...

अंगणवाड्यांमधून गैरव्यवहार झाल्याचे उघड

national news
महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात दररोज तब्बल 64 लाख रुपयांचा ...

स्टंटबाजाला अटक, दिली पोलीस कोठडी आणि दंड

national news
दोन दिवसांपुर्वी मुंबईतील धावत्या लोकलच्या दरवाज्यात उभे राहून एक तरुण स्टंट करत होता. ...

छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री भूपेश बघेल होणार

national news
छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाबाबत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स अखेर ...

शपथग्रहणाच्या आनंदात काँग्रेसला धक्का,शीखदंगली प्रकरणी ...

national news
दिल्ली हायकोर्टाने सोमवारी काँग्रेस नेता सज्जन कुमारला 1984 मधील शीखदंगली प्रकरणी दोषी ...