शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

येथे चार नंबर आहे मृत्यूचा आकडा

प्रगत मानला जाणारा दक्षिण कोरिया हा देश अजबगजब देश आहे. येथील नागरिक अंधश्रद्धाळू आहेत व दीर्घकाळ पूजा अर्चा करण्यात वेळ घालवितात. येथे अनेक समजुती आजही प्रचलित आहेत व त्या फारच मजेशीर आहेत. बघू काय आहेत त्या समजुती:
 
या देशात चार नंबर हा मृत्यूचा आकडा मानला जातो, त्यामुळे उंच इमारती बांधल्या गेल्या तरी 4 नंबरचा मजला नसतो. हॉस्पिटल, लिफ्टलाही चार नंबरचा उल्लेख नसतो.
 
येथील नागरिक जन्माला येतानाच एक वर्षाने मोठे असतात. म्हणजे जन्माला आलेले मूल 1 वर्षाचेच मानले जाते.
 
लाल हाही येथे मृत्यूचा रंग मानला जातो व त्यामुळे येथे लाल रंगाच्या शाईचा वापर केला जात नाही.
 
तसेच येथे नागरिकांना कुठेही, कधीही दारू सेवनाची परवानगी आहे. मग तो बार असो, शॉप असो वा रेल्वे असो. येथे व्हेंडींग मशीनमधूनही दारू मिळते. त्यामुळे बरेचदा टल्ली झालेले लोक येथे आढळतात. 
 
येथे महिन्यातला चौदावा दिवस हा रोमँटिक दिवस मानला जातो. या दिवशी मुली मित्रांना अथवा बायका नवर्‍यांना काही भेटवस्तू देतात मात्र मित्र व नवरे लोकांना त्या बदल्यात 14 मार्च रोजी तिप्पट रकमेच्या भेटवस्तू द्याव्या लागतात.
 
येथे रक्तगटाला अतिशय महत्त्व दिले जाते. तुम्ही चांगले आहात का वाईट, तसेच धोकेबाज आहात का प्रामाणिक याची परीक्षा रक्तगटावरून केली जाते.