गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

'व्हॉल्वो'ची जगातील मोठी बस

जगातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी व्हॉल्वो ने जगातील सर्वात सर्वाधिक प्रवासी क्षमतेची बस ग्रॅन आर्क्टिक 300 ही फेट्रान्सरीओ या प्रदर्शनात प्रदर्शित केली. ही बस ब्राझीलमधील द्रुतगती बस वाहतूक मार्गांवर धावणार आहे.
 
या बसची लांबी तब्बल 30 मीटर असून प्रवासी क्षमता 300 आहे.
ही बस सध्या या मार्गांवर वापरल्या जाणार्‍या सर्वसामान्य आकार आणि क्षमतेच्या 3 बसेसची जागा घेऊ शकणार आहे. या बसच्या वापरामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक, सुरक्षित आणि वेगवान सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार आहे, तर सार्वजनिक वाहतूक करणार्‍या संस्थांच्या खर्चात कपात होणार असल्याने ती अधिक किफायतशीर ठरणार आहे, असा दावा कंपनीच्या लॅटीन अमेरिका विभागाने प्रमुख फॅबियानो टेदेशचिनी यांनी केला आहे.