बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

#Webviral! फेसबुक अकांउट असणार्‍या मुलांना शाळेत प्रवेश नाही

सोशल मीडिया जीवनातला महत्त्वाचा भाग झाला असून टीनएजर्स आणि लहान मुले यावर सर्वात जास्त बिजी असतात. अलीकडे 12 वर्षापासूनच मुले सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असतात तर 15 वर्षाच्या मुले इंस्टाग्राम ज्वाइन करून घेतात, किती लोकप्रिय झाल्या आहे सर्व सोशल साईट्स आणि सतत वाढत चालली आहे फॉलोअर्सची संख्या.
 
नवीन जनरेशन पूर्ण वेळ सोशल मीडियावर ऍक्टिव असते, त्याचा भरपूर आनंद घेते असते. याशिवाय काही क्षण घालवणेही त्यांना जड जातं, पण आपली काय रिऍक्शन असेल जेव्हा आपल्याला माहीत पडेल की ज्या मुलांचे फेसबुकवर अकाउंट आहे त्यांना शाळेत ऍडमिशन मिळणार नाही. 
 
चेन्नई येथील एक शाळा, श्रीमथि सुंदरवल्ली मेमोरियल स्कूल, येथे सोशल मीडिया अकाउंट असलेल्या मुलांना प्रवेश नाही. शाळेच्या ऍडमिशन फॉर्मवर आपल्या यासंबंधी माहिती भरणे आवश्यक आहे.
या नियमावर चांगलाच तर्क चालू आहे. काही याचे समर्थन करत आहे तर काही हा पोरकट नियम असल्याचा हल्ला करत आहे. चेन्नई नेहमी आपल्या शिक्षण संस्थांच्या नियमांमुळे चर्चेत राहणारे शहर आहे. पण याला वेडेपणाचा नवीन नमुना असेही म्हणण्यात येत आहे. सोशल मीडिया यूजर्सप्रमाणे, हे नियम अती कठिण आहे. त्याच्याप्रमाणे शाळा लोकांच्या पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ करत आहे.
 
या नियमाचा एक विपरित परिणाम म्हणजे मुले डिजीटल जगात होत असलेले बदल, अपडेट्स यापासून वंचित होतील आणि जिथे इतर मुले पुढे वाढत जातील तिथे अश्या शाळेत जाणार्‍या मुलांची समज अविकसित राहील.