शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

प्रयत्नांच्या प्रकाशात येणारी अपेक्षा

-जयदीप कर्णिक (संपादक)  
जेव्हा वर्ष बदलतं, तेव्हा आम्ही थांबून विचार करण्यास बाध्य होतो. तसं तर प्रत्येक क्षण वेळेच्या धारेवर एक लहानसा टिंब आहे.... पण आम्ही त्याच्या बहाण्याने इसवी सन असणारे भिंतीवर टांगलेले कॅलेंडर बदलतो, आकडे बदलतात, तर या वक्फे चा वापर मागे पालटून बघायला आणि पुढचे स्वप्न बघण्यासाठी करून घेतो. यात काही चुकीचे देखील नाही आहे. कारण आम्ही घड्याळीचे धावते काटे आणि कॅलेंडरवर बदलत असलेल्या तारख्यामध्ये स्वत:ला जवळून जुळवून घेतो. या लौकिक जीवनात काळाचे हे खंड आणि बदलत्या वर्षाचे आकडे आम्हाला रोमांचितपण करतील आणि जीवनाबद्दल विचार करण्याची संधी देखील देतील. 
 
जगाच्या परिदृश्याची बाब केली तर वर्ष 2017चा आगाज अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात रॅली आणि घोषणाने झाले. बराक ओबामाच्या यांच्या नेतृत्वात आठ वर्षांपर्यंत अमेरिकेच्या एक मोठ्या तबक्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय एक फार मोठा झटका होता. त्यांना थोडीही कल्पना नव्हती की वेगळ्या प्रकारच्या गोष्टी करणारा हा अरबपती, अमेरिकेतील आतापर्यंतच्या “तयार केलेले” उदारवादी चेहर्‍यांना अंगठा दाखवून, स्थापित मान्यतांना आव्हान देऊन, मिडियेला अंगठा दाखवून, महत्त्वपूर्ण अमेरिकी धोरणांना डोक्यावर उभे ठेवून असा देशाच्या सत्तेवर आपले राज्य गाजवेल. पण असे झाले आहे. 2016च्या शेवटी ही दस्तऐवज लिहिण्यात आली होती. 2017ने तर त्याची फक्त औपचारिक ताजपोशी केली होती. डोनाल्ड ट्रम्प, त्यांचे धोरण आणि त्यांचे कार्यकाल या साठी देखील महत्त्वपूर्ण आहे कारण ते फक्त अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रभावित करतील. जसे की त्यांनी वर्षाच्या शेवटी येरूशलमला इस्रायलची राजधानी घोषित करून देखील दाखवले आहे. याच प्रकारे त्यांच्या नेतृत्वात अमेरिकेत इंटरनेटला स्वतंत्र ठेवण्याच्या विरोधात जो निर्णय घेण्यात आला तो देखील संपूर्ण जगात चर्चेचा विषय आणि दूरगामी प्रभाव सोडणारा निर्णय आहे. वर्ष 2018 यांचे पुढचे धोरण आणि या प्रकारच्या निर्णयांना टकटकी लावून बघेल. 
 
तिकडे चीनमध्ये माओ नंतर शी जिनपिंग यांनी आपले सामर्थ्य वाढवले आहे. ते फक्त दुसर्‍यांदा राष्ट्रपती बनले नसून त्यांनी कम्युनिस्ट पक्षात देखील आपल्या वर्चस्वाला मजबूत केले आहे. संपूर्ण जगाला आणि खास करून भारतासाठी त्यांना हा दुसरा कार्यकाल फारच महत्त्वाचा असेल. पाकिस्तानसोबत त्यांनी वाढणार्‍या उतारांमुळे मुळे अमेरिकेने भारताशी आपली निकटता वाढली आहे.
 
त्या शिवाय देखील हे जग रोहिंग्या, बिटकॉइन, पनामा कांड आणि युरोपच्या आर्थिक प्रकरणात अडकलेले राहिले. भारतासाठी चांगले वृत्त असे झाले की अप्रवासी भारतीयाचा मुलगा लियो वरदकर आयरलँडचा पंतप्रधान बनला. अजून ही बर्‍याच बांधणीवर भारतीयांनी आपल्या कौशल्याच्या बळावर बरेच यश मिळविले. 
 
आपल्या देशाने 8 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयात नवीन वर्षात प्रवेश केले होते. अशी अपेक्षा होती की यामुळे चांगले परिणाम बघायला मिळतील, पण हे सर्व ठीक होण्यास अद्याप वेळ लागणार आहे. बँक आणि एटीएमच्या मागे लांब लांब रांगा जरूर कमी झाल्या आहे पण नोटाबंदीवर चर्चा आणि अंदाज कायम राहणार आहे. हे सर्व होत नाही तर अर्ध वर्ष निघाल्यानंतर एक अजून मोठा निर्णय जीएसटीच्या रूपात घेण्यात आला असून हे 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आले. यावर अजून ही चर्चा सुरू असून सरकारकडून यावर फेरबदल देखील करण्यात येत आहे. या प्रकारे 1 मे पासून लाल दिवा हटवण्याचा निर्णय देखील फार मोठा आहे. 22 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने सरकार द्वारे ‍3 घटस्फोटावर रोख लावण्याचा निर्णय देखील महत्त्वपूर्ण आहे. वर्ष संपता संपत सरकारने आपली जबाबदारी निभवत तीन तलाक (तलाक ए बिद्दत)ला संपुष्टात आणण्यासंबंधी विधेयक लोकसभेत सादर केले. हा कायदा बनल्यानंतर देशात शहा बानो पासून सायरा बानोपर्यंतचा एक मोठा प्रवास संपुष्टात येण्याची उमेद आहे. 
 
तर या प्रकारे आम्ही उपलब्धता आणि निराशेतून बरेच टप्पे पार करत वर्ष 2017चा प्रवास पूर्ण केला आहे. जेथे आम्ही क्रायोजेनिक अपर स्टेज इंजन जीएसएलव्ही मार्क IIIचे यशस्वीपूर्वक परीक्षण केले तसेच मुंबईमध्ये एका वर्षात मृत आशा साहनीच्या सापळ्याने आम्हाला हालवून ठेवले. 
 
आज आम्ही 2018च्या पायरीवर आशेचा दिवा लावत आहे आणि हिच इच्छा आहे की आम्हाला लागोपाठ वाढत असलेली कट्टरता, वैमनस्य आणि प्रतिशोधाच्या भावनेपासून मुक्ती मिळायला पाहिजे. 2018पूर्ण झाल्यावर जर आम्ही आठवणी काढू तर चमकणारे इंद्रधनुष्यच दिसायला पाहिजे आणि निराशेचे दिवे दूर दूर पर्यंत आमच्या नजरेतून दूर राहिला पाहिजे. हो हे सर्व जादूने तर होणार नाही पण आम्हाला सर्वांना मिळून हे प्रयत्न करायला पाहिजे.... आम्ही सर्वांनी जर हे प्रयत्न केले तर मग कुठल्याही जादूची गरजच काय... हो ना? आमची उमेद आणि परिश्रमाने केलेल्या प्रयत्नांनी येणारे वर्ष 2018 किती सुंदर असेल!!! 
तर याच उमेदीने प्रयत्न देखील करा?
तुम्हा सर्वांना नवीन वर्ष 2018च्या शुभेच्छा...