शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

अरे यार, भेळपुरी आता ऑक्सफर्ड डिक्शनरीत

ऑक्सफर्ड डिक्शनरीने अस्सल भारतीय अरे यार, चुडीदार, भेळपुरी आणि ढाबा हे शब्द इंग्रजी शब्द म्हणून स्वीकारले असून त्याचा समावेश डिक्शनरीत केला आहे.
 
त्यामुळे अरे यार हे केवळ हिंदुस्तानी संबोधन राहिलेले नाही तर ते इंग्रजी संबोधनही झाले आहे. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या सल्लागार संपादिका डॉ. डानिका साल्जर म्हणाल्या की भाषेवर मोठ्या प्रमाणावर केलेल्या संशोधनात हे शब्द इंग्रजी भाषेतही वापरात असल्याचे दिसून आले आहे. 
 
या शब्दांचे स्वत:चे असे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भाषामहत्त्व आहे. 1845 पासून हे शब्द इंग्रजीत वापरले जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. 
 
चुडीदार हा शब्द 1880 पासून इंग्रजी भाषेत वापरला जात आहे मात्र डिक्शनरीत सामील होण्यासाठी त्याला 135 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली आहे. या शब्दाचा अर्थ दक्षिण आशियात घातला जाणारा व अंगाबरोबर बसणारा घोट्यापाशी चुन्या असणारा ट्राऊजर असा देण्यात आला आहे.