बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जून 2015 (10:47 IST)

औद्योगिक विकास-पर्यावरणहानी

भारतीय संस्कृतीचा उगम अरण्य, आश्रम यांच्याशी निगडित असल्याचे अनेक ग्रंथांच्या अवलोकनातून दिसून येते. ‘अहिंसा परमोधर्म:’ सारखी सुत्रे सूक्ष्म प्राण्याबद्दल आत्मीयता दर्शवितात. इ.स.पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्याच्या राजकीय आणि अर्थशास्त्रीय लिखाणात वनांचे महत्त्व विषद केले आहे. चंद्रगुप्त मौर्यच्या कारकिर्दीत वने तसेच वन्य प्राण्यांच्या संरक्षणाची काळजी घेण्यात आली होती. इ.स.पूर्व 272 ते 232 या काळात सम्राट अशोकांनी देशाच्या महामार्गाच्या दुतङ्र्खा झाडे लावण्याचा दंडक केला होता. तसेच शेरशहा सुरीच्या कारकिर्दीतही वृक्ष लागवड मोठय़ा प्रमाणात केल्याचे आढळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रातून झाडांविषयी आपले मनोगत व्यक्त करून कडक निर्देश दिले आहेत.
 
यावरून भारतात पर्यावरणाबाबत समृध्द परंपरा असल्याचे आणि अनेक संतांनी त्यांच्या काव्यातून पर्यावरणासंबंधी आपले विचार व्यक्त   केले तरी भारतीय संस्कृतीचा अभिमानाने उल्लेख करणार्‍या भारतीयांनी आपल्या पूर्वजांचे विचार प्रत्यक्षात अंमलात आणले नसल्याची जाणीव होते. म्हणूनच पर्यावरणाचा समतोल ढासळत चालल्याचे दिसून येत आहे. आपल्या पूर्वजांनी निसर्ग रक्षणासाठी जे जे उपाय सांगितले आहेत ते जर का आपण अंमलात आणले तर आपला भारत देश खरोखर महान ठरल्याशिवाय राहणार नाही. 
 
जगातील निसर्ग संपत्ती मर्यादीत असून हवा, पाणी, जमीन, खनिजे, तेलसाठे, वने, माळराने, समुद्र आणि शेती व पशुधनापासून मिळणारे पदार्थ आपल्या जीवनासाठी पूरक आणि अत्यंत आवश्यक आहेत. वाढल्या लोकसंख्येमुळे आपल्याला लागणार्‍या साधनांची गरज वाढल्यामुळे पृथ्वीवरील उपलब्ध संसाधने ही सतत वाढती गरज पुरवू शकतील, अशी अपेक्षा करणे साङ्ख चुकीचे आहे. पृथ्वीवरील संसाधनांचा मोठय़ा प्रमाणात दुरुपयोग होत असून दैनंदिन व्यवहारासाठी मोठय़ा प्रमाणात पाण्याचा गैरवापर करून नैसर्गिक जलसाठे प्रचंड प्रमाणात प्रदूषित करीत आहेत. याबरोबरच प्रचंड प्रमाणात प्लास्टिकची निर्मिती करुन प्रदूषणकारी कचरा निर्माण करून पर्यावरणाच्या पापाचे आपण धनी होत आहोत. औद्योगिक उत्पादन प्रक्रियेतून घन कचर्‍याच्या रुपात कित्येक टाकाऊ पदार्थ निर्माण केले जात आहेत. याबरोबरच मोठय़ा प्रमाणात होत असलेल रासायनिक द्रव रुपाच्या प्रदूषणामुळे नैसर्गिक नियंत्रण ठेवणे कठीण असून उपलब्ध पर्यावरणाचा समूळ नाश करणारी भयानक रासायनिक द्रवरुपे उदयास येत आहेत. ही प्रदूषणे पर्यावरणात साठवली जाऊन रोगराई पसरून आपल्या जीवनाला ग्रासणार्‍या इतर अनेक पर्यावरण समस्या निङ्र्काण होत आहेत. आज मोठय़ा शहरात स्वयंचलित वाहनाची बेसुमार वाढती संख्या लक्षात घेतल्यास त्यांच्या ज्वलनशील पदार्थातून बाहेर पडणार्‍या विषारी वायूमुळे हवाही प्रदूषित होऊन या वायू प्रदूषणामुळे अनेक व्याधी जडत आहेत. सजीवांमध्ये बुध्दीमान प्राणी म्हणून मानव वावरत आहे. त्याच्या वागणुकीतून सजीवसृष्टीच्या विकासापेक्षा स्वहितार्थ त्या सृष्टीच्या विनाशाच वाटेवरच पाऊल पडत आहेत. अद्यावत तंत्रज्ञानाच्या अनिर्बध वापराच्या बळावर आधुनिक शेतीच्या जोरावर रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा मोठय़ा प्रमाणात वापर करून अधिक अन्नधान्याची निर्मिती करणे शक्य झाले. पाळीव प्राणी व वनस्पतींच्या सुधारीत वाणांची निर्मिती आणि धरणांच्या निर्मितीमुळे मोठय़ा प्रमाणावर जमिनी सिंचनाखाली आणून वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अधिक उत्पादन करणे शक्य होत असले तरीही एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानामुळे जलद आर्थिक प्रगती करण्याच्या चढाओढीत जलद विकास प्रक्रियेमुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. पर्यावरणाची स्थिती सुधारण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या विकास आराखडय़ात केवळ आर्थिक विकासावर भर देण्यात आला. अशा विकास प्रकल्पावर हवा आणि पाणी यांच्या प्रदूषणामुळे विपरीत परिणाम होऊ लागला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अनेक वर्षापूर्वी योग्य पर्यावरण नियोजन व खेडय़ांची संकल्पना मांडली होती. या योजनेंतर्गत मानवी व पशुद्वारे निङ्र्काण होणार्‍या उत्सर्जकांचे खत तयार करणे, पुनर्वापर करता येण्यासारख्या वस्तूंपासून बनवलेले खेळती हवा असलेले घर निङ्र्काण करण्याची संकल्पना अंर्तभूत होती. गांधीजींनी गावातील रस्ते सुंदर व स्वच्छ असावेत, अशी संकल्पना मांडली. औद्योगिक प्रक्रियेद्वारे निर्माण होणार्‍या वस्तूऐवजी खेडय़ातील कुटीरोद्योगाद्वारे निङ्र्कित वस्तूंचा वापर करण्यावर त्यांचा अधिक भर होता. गांधीजींनी मांडलेली पर्यावरणासंबंधी ही तत्त्वे आज दूरगामी टिकावू पर्यावरण नियोजनाचा प्रमुख घटक मानले जातात. समाजाने टिकाऊ र्पावरणास्नेही जीवनशैलीचा अवलंब करणची नितांत गरज निङ्र्काण झाली आहे. अन्था र्पावरणाचा नाश, र्‍हास होऊ शकतो. 
 
स्विडनमधील स्टॉकहोम येथे 1972 साली भरलेल्या पहिल्या पृथ्वी परिषदेत गरिबी हे सर्वात मोठे प्रदूषण असल्याचे मत इंदिरा गांधींनी मांडले होते. आर्थिकदृष्टय़ा संपन्न देशातील पर्यावरणविषयक समस गंभीर आहेत. त्याचचबरोबर आशिा, आफ्रिका खंडातील प्रगतिशील देशातील वाढती लोकसंख्या ही सर्वात मोठी समस्या असून वाढत्या लोकसंख्येद्वारे अधिक प्रमाणावर वापरल जाणार्‍या नैसर्गिक संसाधनांचा नाश ही गंभीर समस्या होऊन बसली आहे, अशा तर्‍हेने जगभर आज नैसर्गिक संसाधनांचे समान वाटप कसे करावे, यासंबंधी विचारविमर्श सुरू आहे. आज अस्तित्वात असलेल्या आर्थिक विकास धोरणामुळे नैसर्गिक संसाधनांचा झपाटय़ाने वापर होत आहे. उद्योगांची उभारणी करताना योग्य नियोजन केले नाही तर पर्यावरणाची हानी होते. 
 
उद्योगांना, प्रकल्पांना मंजुरी देताना र्पावरणाचा विचार केला जावा.
 
काशीनाथ जावेर