शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

कबुतरे आणि माकडांचेही कुटुंबनियोजन

जगात आजकाल माणसांपेक्षा पशुपक्षी यांची संख्या वेगाने वाढत चालली आहे व काही देशात तर काही प्राणी अथवा पक्ष्यांमुळे माणसांना जगणेही कठीण होऊ लागले आहे. परिणामी अशा प्राणीपक्षंच्या संख्येवर नियंत्रण आणणे गरजेचे बनले असून त्यासाठी त्यांचे कुटुंबनियोजन केले जात असल्याचे समजते.
 
स्पेनमधील बडिया डेल वॅलेस हे गाव भारतातील आग्रा ही त्याची दोन उदाहरणे म्हणून देता येतील. स्पेनच्या बडिया डेल वॅलेस गावातील नागरिक तेथील कबुतरांच्या संख्येने हैराण झाले आहेत व या कबुतरांची संख्या मर्यादित राहावी म्हणून तेथे कबुतरांच्या दाण्यातच गर्भप्रतिबंधक गोळ्या घातल्या जात आहेत. जुलै ते आक्टोबर हा कबुतरांच्या वीणीचा हंगाम असतो.

कबुतरे दाणे खायला येतात त्या ठिकाणीच या गोळ्या देणारे व्हेंडींग मशीन बसविले गेले आहे. दिवसांतून तीन वेळा कबुतरांना दाणे टाकले जातात त्यातच या गोळ्या मिसळल्या जातात.
आग्रातील नागरिकांनाही असेच माकडांनी हैराण केले आहे. सध्या आगर्‍यात 8 हजार माकडे आहेत व त्यांच्या वाढीचा वेग पाहिला तर सहा वर्षात ही संख्या 2 लाखांवर जाण्याची लक्षणे दिसत आहेत. त्यासाठी येथे एका स्वयंसेवी संस्थेने जिल्हा प्रशासन व आग्रा डेव्हलपमेंट अँथॉरिटीच्या सहयोगाने माकडांसाठी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया उपक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत 552 माकडांना अशी लस दिली गेली आहे.