शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 20 डिसेंबर 2014 (10:17 IST)

कामगारांना पाचपट अधिक पगार

जगातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणून ओळखल जाणार्‍या ताजमहालाच्या उभारणीची कहाणीही तितकीच प्रेरणादायक आहे. चौदाव्या बाळंतपणात मातृत्वमुखी पडलेली आपली लाडकी बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ शाहजहानने हा भव्य मकबरा उभा केला. मुमताजसाठी ताजमहाल तयार करण्यासाठी शाहजहानने आपले सर्व छंद आणि विलासी आयुष्य बाजूला ठेवले होते व तो ताजच्या निर्मितीच्या स्वप्नानेच पछाडून गेला होता. ताजमहाल तयार करण्यासाठी त्याकाळातील अभिंते आणि 22 हजार कामगारांच्या मदतीने 22 वर्षात ताजमहाल तयार करणे हे शाहाजहानसमोर एक आव्हान होते, असे मत आयआयटीचे रुडकीचे प्रोफेसर डॉ. एस.सी. हांडा यांनी व्यक्त केले. ताजमहाल तयार करण्‍यासाठी पार्शियामधून बोलावण्यात आलेल्या तज्ज्ञांना 361 वर्षापूर्वी 1500 रुपये महिना देऊन ताजमहालाचे काम पूर्ण करून घेतले. या तज्ज्ञांबरोबरच कामगारांनाही पाचपट अधिक रोजगार देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. ताजमहालचीनिर्मिती आणि इतिहास या कार्यशाळेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.