शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 27 एप्रिल 2015 (16:48 IST)

गायीच्या दुधाने एड्सचा इलाज!

एड्ससारख्या खतरनाक आजारावर रामबाण उपचार शोधण्यासाठी जगभरातील शास्तज्ञ प्रयत्नशील आहेत, पण अजूनही त्यात यश मिळू शकलेले नाही. मात्र हा भयंकर रोग जडलेल्या नवजात मुलांच्या उपचारासाठी गायीचे दूध उपयुक्त ठरू शकते, अस दावा हल्लीच झालेल्या एका संशोधनाआधारे केला आहे.

गायीच्या दुधामधील प्रथिनांच्या संरचनेमध्ये फेरबदल करून त्यामध्ये रेट्रोवायरल औषधे मिसळण्याची पद्धत शोधण्यात आली आहे. त्यामुळे गायीचे दूध एड्सच्या उपचारासाठी उत्तम औषध ठरू शकते, असे या अध्ययनात म्हटले आहे. अमेरिकेच्या पेन्सिल्वेनिया स्टेट युन्विहर्सिटीचे प्राध्यापक फेटेरिको हार्ट यांनी सांगितले की, हे भौतिक-रासायनिक गुण मुलांच्या प्रतिकारकशक्तीला आव्हान देतात. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी हार्ट व त्यांच्या सहकार्‍यांनी दुधात आढळून येणार्‍या प्रथिनांचा समूह केसिन्स वर वापर करून पाहिला.

सस्तन प्राण्यांच्या दुधात आढळणारे केसिन्स प्रथिने आईपासून मुलांमध्ये अॅमिनो अॅसिड व कॅल्सियम वितरण्याची नैसर्गिक व्यवस्था आहे. हेरिटोनावीर औषधांच्या अणूंनाही वितरित करू शकतात, असे हार्ट यांच्या लक्षात आले.