शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनाबद्दल- असा घेऊ शकता या योजनेचा लाभ

भारतात लिंगानुपात प्रत्येक वर्गासाठी काळजीचा विषय आहे. म्हणूनच महिलांच्या शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजांसाठी सरकारद्वारे अनेक योजना चालवण्यात येत आहे. त्यातूनच एक सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश्य मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या लग्न सोपेरित्या पार पाडणे आहे. 
या योजनेतंर्गत डाक विभागात ‘सुकन्या समृद्धी योजना’ अकाउंट उघडलं जाऊ शकतं. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये हे खाते खोलण्याची सोय आहे. येथे आवश्यक दस्तऐवज जमा करवून खाते खोलेल जाऊ शकतात.
 
ही आहे योजना:
 
* सुकन्या समृद्धी योजनेत खात्यात मुलीच्या नावावर एका वर्षात 1 हजार ते 1 लाख पन्नास हजार रुपये जमा करू शकता.
  
* हे पैसे अकाउंट खोल्याच्या 14 वर्षांपर्यंत जम करावे लागतील आणि हे खाते मुलगी 21 वर्षांची झाल्यावर मॅच्योर होईल.
 
* नियमांप्रमाणे मुलगी 18 वर्षांची झाल्यावर अर्धा पैसा काढता येईल.
 
* 21 वर्षांनातर खाता बंद होऊन पैसे पालकांच्या स्वाधीन केले जातील.
 
* जर मुलीचे 18 ते 21 वर्षाच्या आत लग्न झाले तर खात बंद होईल.
 
* उशिरा पेमेंट केल्यास 50 रुपये पेनल्टी लावण्यात येईल.

* पोस्ट ऑफिसव्यतिरिक्त काही शासकीय आणि निजी बँक पण या योजनेत खाते उघडत आहे.
 
* या खात्यांवर आयकर कायदा धारा 80-जी अंतर्गत सूट देण्यात येईल.
 
* पालक आपल्या दोन मुलींसाठी दोन खाते उघडू शकतात.
 
* जुळे झाल्यास प्रूफ देऊन तिसरा खातेही उघडवू शकतात.
 
* मुलीचा मृत्यू अथवा 18 वर्षाच्या आत विवाह झाल्यास सदर रक्कम पालकास न देता शासनाच्या खात्यात जमा केली जाईल.
 
* अकाउंट ट्रांसफर केले जाऊ शकते.
योजनेसाठी आवश्यक दस्तऐवज:
* जन्म नोंदणी प्रमाणपत्र
* ऍड्रेस प्रूफ
* आयडी प्रुफ
 
याचे फॉर्म ऑनलाईन उपलब्ध आहे.