मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|
Last Modified: जळगाव , सोमवार, 29 ऑगस्ट 2011 (15:40 IST)

जैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा!

PR
वर्षभर शेतात राबून आपल्या मालकाचे पोट भरण्याबरोबरच देशाच्या सर्वागीण विकासात सिंहाचा वाटा उचलणार्‍या बैलांना पोळ्याला देवस्वरूप मानून तंच प्रति कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे पोळा हा सण हो. पुढील वर्षाच्या पोळ्यात आपल्या सर्व शेतीसाईटचे बैलं, सालदार सहभागी करण्यात येऊन तो अधिक उत्साहाने साजरा केला जाईल. असे विचार जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत भवरलालजी जैन यांनी व्यक्त केले. विदेशी पाहुणंच उपस्थितीत जैन इरिगेशनच जैन हिल्स येथे आज पोळ्याचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जैन हिल्स येथे सुमारे २० बैल जोड्या आहेत. सकाळपासूनच सालदार बैलांच्या सेवेत, त्यांना आकर्षकपणे सजविण्यात गुंतले होते. आरंभी बैलांना स्वच्छ धुवून त्यांची शिंगे आकर्षकपणे रंगविण्यात आली. बैलांच्या अंगावर रंगीबेरंगी झुली चढवून आणि चंगाळे, घुंगरे आदी घालून मिरवणूक काढण्यात आली. या सोबत लाडक्या बैलांची ढोल वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली. यासाठी नंदूरबार येथील नानू पावरा यांच वागटासह, सावखेडा येथील पारंपरिक वा वाजविणार वाद्यवृदास खास पाचारण करणत आले होते. यावेळी पारंपरिक वाद्याच्या ठेक्यात नृत्यासोबत विविध कसरती देखील मोठ्या कल्पकतेने सादर केल होत. बैलगाडी, रेल्वेगाडी, मानवी मनोरे आदींचा सावेश होता. विदेशी पाहुणे या कसरती पाहून भारावले. ढोल व अन्य वाद्यांच्या गजरात जैन इरिगेशनचे संस्थापक, उपाध्क्ष अशोक जैन, व्यवस्थापकी संचालक अनिल जैन, विपणण संचालक अतुल जैन यांचासह ब्रिटन, टांझानिया, लंडन, अमेरिका या देशांच्या पाहुणंनी देखील वाद्याच्या गजरात ठेका धरला होता. आंब्याच्या डहाळ्या, फुलांच्या, नारळाचे तोरण तोडून पोळा फोडला गेला. सालदारांनी ढोल ताशांच्या निनादात बैलांना मिरवत आणले. प्रारंभी भवरलालजी जैन, अशोक जैन आणि जैन परिवारातील सुष्नांनी बैलांची पूजा केली. पोळा कसा साजरा होतो हे बघण्यासाठी अनुभूती निवासी शाळेचे तसेच यावर्षी सुरु झालेल्या दारिद्रय रेषेखालील उत्पन्न गटासाठी सुरु करण्यात आलेल्या अनुभूती इंग्लिश स्कूल क्र. २ चे चिमुकले विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

पोळचे ठरलेले कार्यक्रम आटोपल्यावर जैन हिल्स येथे विदेशी पाहुणंसह आदरणीय भवरलालजी जैन यांनी उपस्थितांसोर आपले विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपल्या भारतात शेती आणि बैल यांचे नाते टिकून आहे. विदेशात यांत्रिक पद्धतीने शेती केली जाते परंतु भारतात अल्पभूधारक शेती असल्यामुळे आजही बैलांच्या मदतीने शेतीची कामे करण्यात येतात. माझा जन्म वाकोद सारख्या छोट्या गावात झाला त्यामुळे बैल, शेतकरी आणि त्यांच्या अडचणी मला ठाऊक आहेत. मलाही यांत्रिक पद्धतीने शेती करणे सहज शक्य आहे परंतु सालदार, बैल पाहिल्याशिवाय समाधान वाटत नाही. त्यामुळे बैल, सालदार आणि शेती यांचे नाते घट्ट झाले आहे. भवरलालजी जैन याच्या संबोधनानंतर त्यांच्याहस्ते एकूण ४५ सालदार आणि त्यांच्या सौभाग्वतींना भेटवस्तू, कपडा, साडी-चोळी देऊन गौरविण्यात आले. याच बरोबर ३८ ट्रॅक्टर व वाहन चालकांचाही भेटवस्तू, टोपी, कपडा देऊन विदेशी पाहुणे, मान्यवर तसेच सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन यांच्याहस्ते देखील त्यांच्या घरधणीनींचा सत्कार केला गेला. यानंतर सालदारांना मिष्टांन्न देण्यात आले. यावेळी वाढण्याचे काम फार्म सुपरवाझर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ अनिल ढाके, विजयसिंग पाटील, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे गौत देसर्डा, ए.पी. बागुल, एस.बी. ठाकरे, ए.बी. खंबावत, बी.डी. पाटील, शशिकांत संत, एस. पी. पाटील यांनी परिश्रम घेतले.