शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2016 (14:42 IST)

तुम्हाला माहीत आहे का पाणीपुरीची दहा नावे?

चाट म्हटलं की तोंडाला पाणी टतेच. त्यातच भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरीची गाडी म्हणजे मुंबईकरांचा चाट कॉर्नर. तिखट-आंबट, गोड पाण्यांनी भरलेली ही पाणीपुरी लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का मुंबई महाराष्ट्रात ओळखली जाणारी ही पाणीपुरी देशात, देशाबाहेर तब्बल 10 नावांनी ओळखली जाते.

पाणीपुरी - महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू तसेच नेपाळच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरी हा पदार्थ याच नावाने ओळखला जातो.

पुचका- पश्चिम बंगाल आणि आसाम या पूर्व भारतात पाणीपुरीला पुचका या नावाने ओळखले जाते.

बांगलादेशातही तसेच बिहार आणि झारखंडमध्येही हा पदार्थ याच नावाने ओळखला जातो.

गोलगप्पे - उत्तर भारतात पाणीपुरीला गोलगप्पे हे नाव आहे.

पकोडी - पकोडी म्हटल्यावर गोंधळून जाण्याची गरज नाहीये. गुजरातच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरीला पकोडी म्हटले जाते.