शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

तुम्ही परप्रांतीय आहात काय?

ND
ND
शिक्षण असो वा नोकरी किंवा स्थायिक व्हायचं म्हणूनही तुम्ही 'सीमोल्लंघन' केलंत आणि गेलात महाराष्ट्राची सीमा लंघून. एखाद्या परराज्यात किंवा परदेशातही. मग आपोआपच तुम्हीही ठरलात 'परप्रांतीय'. दुसर्‍या राज्यात, देशात 'परप्रांतीय' म्हणून रहाताना तुम्हाला काय अनुभव आला? स्थानिकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय? दुय्यमत्वाचं जीणं जगताना तुमचा मराठी बाणा दुखावला तर नाही गेला?

आणि हो, इकडे तर राज ठाकरेंनी परप्रांतीयांना सणसणीत मराठी झटका दिलाय. पण परप्रांतीय म्हणून स्वतः जगताना तुम्हाला महाराष्ट्रात होणार्‍या या 'नवनिर्माणा'विषयी काय वाटतंय? दसर्‍याच्या निमित्ताने आम्ही ही संधी आपल्याला देऊ केलीय. खाली दिलेल्या मोकळ्या जागेत आपल्याला या विषयावर जे वाटतं ते अगदी मनमोकळेपणाने व्यक्त करा. आणि हो, तुमचं नाव लिहिताना तुम्ही कुठे रहाता ते लिहायलाही विसरू नका.