बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2016 (15:56 IST)

'त्या' गावात केवळ महिलाच साजरी करतात होळी!

दरवर्षी देशभरात स्त्री-पुरुष होळीचा सण उत्साहात साजरा करतात. मात्र उत्तर प्रदेशातील मीरपूर जिल्ह्यातील कुंडरा गावात गेल्या अनेक वर्षांपासून केवळ महिलाच होळी खेळतात. तर होळीच्या दिवशी पुरुष नेहमीप्रमाणे काम करतात. 
 
होळीच्या दिवशी कुंडरा गावातील पुरुष नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी जातात. तर गावातील रामसीतेच्या मंदिरात गावातील महिला एकत्र येतात आणि धुमधडाक्यात होळीचा सण साजरा करतात. तीस वर्षांपूर्वीपर्यंत गावातील महिला आणि पुरुष एकत्रपणे रामसीतेच्या मंदिरात होळी साजरी करत होते. एकदा एका दरोडेखोराने गावातील एका व्यक्तीला पोलिसांचा खबर्‍या असल्याच्या संशयावरून गोळी मारून ठार केले. तेव्हापासून पुढे पाही वर्षे गावात होळी साजरी केली जात नव्हती. 
 
होळी साजरी करावी यासाठी गावातील महिला पुरुषांना समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र पुरुषांनी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे एकदा गावातील सर्व महिलांनी एक‍त्र येऊन रामसीतेच्या मंदिरात जाऊन  होळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आजपर्यंत गावातील महिला होळीचा सण ज्येष्ठांचा सन्मान करण्यासाठी एरवी साडीच्या पदराने चेहरा झाकणार्‍या महिला केवळ होळीच्याच दिवशी चेहर्‍यावरील पडदा दूर करून मनसोक्तपणे हसत, खेळत, नाचत होळी साजरी करतात. गावातील प्रत्येक सूनेला कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखण्यात येऊ नये म्हणून सर्व पुरुष होळीच्या दिवशी शेतात जाऊन काम करतात.