गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

नवीन जागेवर का नाही येत झोप?

अनेकदा लोकांना आपण हे बोलताना ऐकले असेल की नवीन जागेमुळे माझी तर झोपच झाली नाही. यामागील लोकं अनेक कारण देतात. 
 
बेड चांगला नव्हता. 
कसली तरी आवाज येत होती.
उजेड येत होता.
जास्त अंधार होता.
तापमान बरोबर नव्हतं.
आणि अनेक असे कारण असतात...

पण खरं काय आहे ते एका शोधात कळून आले आहे. याचे परिणाम ऐकून आपण हैराण व्हाल. अनेकदा आपण रोज झोपत असलेल्या परिस्थितीपेक्षा अधिक सुविधा नव्या जागेवर असल्या तरी झोप येत नसते यासाठी पूर्णपणे आपला मेंदू जवाबदार आहे. 

काय आहे कारण?...

काय आहे कारण?
आपला मेंदू जागा बदल्यावर आम्हाला झोपू देत नाही. हे खरं आहे... आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या शोधात हे कळून आले आहे की नवीन जागेवर झोपताना मेंदूचा एक भाग सतत सक्रिय असतो. जो आम्हाला शांत झोप घेऊ देत नाही. संशोधकांनी सांगितले की आम्हाला झोप येत असतानाही मेंदूचा सक्रिय भाग आम्हाला झोपण्याची परवानगी देत नाही आणि म्हणूनच उजवी ते डावीबाजू करत रात्र निघते. आणि आम्ही स्वत:शी झोपण्यासाठी लढत राहतो.
 
मेंदूचे दोन भाग असतात. दोघांचे ही काम वेगवेगळे आहे. हे आमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर नियंत्रण ठेवतात. पण झोपताना यांची स्थिती भिन्न असते. अध्ययनात संशोधकांनी लोकांचे मेंदू मशीनच्या मदतीने मॉनिटर केले. त्यात आलेल्या परिणामात हे कळून आले की नवीन जागेवर गाढ झोपेतही मेंदूच्या उजव्या बाजूपेक्षा डाव्या बाजूचा भाग निरंतर काम करत होता. यावरून अंदाज घेतला गेला की अश्या वेळी मनुष्याचा मेंदू समुद्री प्राण्यासारखा असतो. जसे व्हेल आणि डॉल्फिनसह अनेक समुद्री जीव झोपताना आपल्या मेंदूचा एक भाग सक्रिय ठेवतात, ज्यामुळे त्यांना झोपेतही येणार्‍या संकटाची चाहूल लागते.
तसेच मनुष्याच्या मनात नवीन जागेची नकळत भीती असते. ही गोष्ट मनुष्य स्वीकार करो अथवा नाही पण त्याच्या मेंदूला या गोष्टीची चांगलीच जाणीव असते आणि म्हणून मेंदू आपला एक भाग सक्रिय ठेवतो. अनेकदा दोन तीन दिवस नवीन जागेवर झोप घेतली की आपोआप शांत झोप यायला लागते. त्यामागेही हेच कारण असावे.