शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 31 डिसेंबर 2014 (17:41 IST)

नवीन वर्षात कामाचे समायोजन करा!

आज नवीन वर्षाचा प्रथम दिवस. आपला हर्ष, उत्साह. आशा, अपेक्षा ह्यांना आलेली नवीन पालवी. आपण नवीन वर्षाच्या योजना तर खुप करतो पण वेळेच्या अभावी त्या अपुर्‍या राहतात परन्तु थोडस वेळेच समायोजन केल तर पहा कस सुसाघ्य होत ते. खालील गोष्टींन वर जरा अमल करण्याचा प्रयत्न करा यश तुमच्या पायाशीच आहे.
 
1. कामाची यादी - सर्व प्रथम कामाची यादी करा त्यानी तुम्हाला कामाला लागणारा वेळ समजेल अन काम सरळ आणि सुगम होइ्ल.
 
2. दिनचर्या - आपली दिनचर्या सुनिष्चित करा त्यानी तुम्हाला तुमचे घ्येय गाठण्यास सोपे जाईल.
 
3. कामाला विभागुन घ्या - कामाची विभागणी केल्यास आवष्यक काम न विसरता पूर्ण होतील.
 
4. वास्तविकता नेहमी लक्षात ठेवा - आपली कार्यक्षमता नेहमी लक्षात असु द्या.
 
5. उद्याच्या कामाची आजच सुरवात करा - कारण त्यानी तुमचे श्रम कमी होतील आणि त्या सोबत आपली घडयाळ, पर्स, मोबार्इ्रल ऐका जागी ठेवल्यास वेळेची पण बचत होईल. 
 
6 .कृपया विसरू नका - कामाची पूर्तता करण्या मधे आपले जेवण वगैरे व्यवस्थित घ्या.
 
7. आवश्यक्तानुसार कामाची विभागणी करा - आवश्यक कामांना क्रमवार निश्चित करा
 
8. झेपेल तेवठेच काम हाती घ्या. 

सौ. स्वाती दांडेकर