शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2015 (15:39 IST)

पंतप्रधानांच्या हस्ते दहाव्या जागतिक हिंदी संमेलनाचे उद्घाटन!

हिंदीला संयुक्त राष्ट्राची अधिकृत भाषा बनविण्यासाठी कसलीही अडचण नसून, यासाठी १२९ देशांच्या सर्मथनाची गरज असल्याचे सुषमा स्वराज म्हणाल्या. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावत असून, लवकरच जागतिक राष्ट्रांचे यास सर्मथन मिळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
संमेलनाचा इतिहास
जागतिक हिंदी संमेलनाचे आयोजन करण्याची ही दहावी वेळ असून, यापूर्वी नऊ वेळा जगभरातील वेगवेगळय़ा शहरांत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिले जागतिक हिंदी संमेलन १९७५ मध्ये नागपूरमध्ये भरविण्यात आले होते. त्यानंतर १९७६ मध्ये दुसरे संमेलन मॉरिशसच्या पोर्ट लुईमध्ये, तिसरे संमेलन १९८३ मध्ये राजधानी दिल्लीत, चौथे संमेलन १९९३ मध्ये मॉरिशसच्या पोर्ट लुई येथे, पाचवे संमेलन १९९६ मध्ये त्रिनिदाद व टोबेगोतील पोर्ट ऑफ स्पेन येथे, सहावे संमेलन १९९९ साली ब्रिटनच्या लंडनमध्ये, सातवे संमेलन २00३ साली दक्षिण अमेरिकेतील सूरिनाममधील पारामारिबो येथे, आठवे संमेलन २00७ ला अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये, नववे संमेलन २0१२ साली दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये भरविण्यात आले होते.नवी दिल्ली : हिंदी भाषेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी आयोजित केले जाणारे दहावे जागतिक हिंदी संमेलन भोपाळमध्ये होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याचे उद््घाटन केले जाणार आहे. १0 सप्टेंबर ते १२ सप्टेंबर असे तीन दिवस चालणार्‍या या संमेलनाचा समारोप गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होईल. अस्खलित हिंदी बोलण्यासाठी ओळखले जाणारे बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन हे संमेलनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. 
 
तब्बल ३२ वर्षांच्या दीर्घ खंडानंतर भारतात जागतिक हिंदी संमेलनाचे आयोजन केले जात असून, यात २७ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन 'आओ अच्छी हिंदी बोले' या विषयावर व्याख्यान देतील. या तीन दिवसीय संमेलनात वेगवेगळय़ा २८ विषयांवर चर्चासत्र पार पडतील. यादरम्यान एका विशेष टपाल तिकिटाचेही अनावरण केले जाणार आहे. यात भोपाळमधील अटलबिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठ, वर्ध्याचे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, आग्रा येथील केंद्रीय हिंदी संस्था, राष्ट्रीय पुस्तक मंडळ, वेबदुनिया, भारतकोश, मायक्रोसॉफ्ट, अँपल, गुगल, सीडॅक अशा संस्था या प्रदर्शनात सहभाग नोंदवतील. या संमेलनासाठी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना औपचारिक निमंत्रण पाठविण्यात आले आहे. याशिवाय संमेलनाच्या अध्यक्षा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सर्व मुख्यमंत्र्यांना वैयक्तिकरीत्या संपर्क साधून त्यांना संमेलनासाठी आमंत्रित करणार आहेत.